local police e challan meta ai
बिझनेस

E Challan : आता रस्त्यांवर लोकल पोलिसही कापणार ई-चलान; ट्रॅफिक नियम मोडणाऱ्यांवर वाढणार कारवाई

Traffic Rules : वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई जास्त कडक होण्याची शक्यता आहे. स्थानिक पोलिसांनाही ई-चलान काढण्याचा अधिकार देण्याचा प्रस्ताव सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही वाहनचालक असाल तर ही बामती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. वाहनचालकांसाठी ट्रॅफिक नियमांशी संबंधित मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ई-चलान जारी करण्याचा अधिकार ट्रॅफिक पोलिसांकडे होता. मात्र आता दिल्ली पोलिसांच्या स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये आणि इतर युनिटमध्ये तैनात असलेल्या पोलिसांनाही ई-चलान काढण्याचा अधिकार देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांनी यासंदर्भातला प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी दिल्ली सरकारकडे पाठवला आहे. सरकारची मंजुरी मिळाल्याने स्थानिक पोलीसही ट्रफिक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर थेट कारवाई करू शकतील.

सध्या कोण ई-चलान कापत आहे?

सध्याच्या व्यवस्थेनुसार रेड सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे किंवा सीट बेल्ट न लावणे यांसारख्या नियमभंगासाठी ट्रॅफिक पोलिसांकडून ई-चलान जारी केले जाते. मात्र, अनेक ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांची उपस्थिती नसते. अशावेळी नियम मोडणारे वाहनचालक स्थानिक पोलिसांच्या नजरेस पडले तरी त्यांना ई-चलान कापता येत नाही. हीच कमतरता दूर करण्यासाठी नवीन व्यवस्था प्रस्तावित करण्यात आली आहे. यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस दिसत नाहीत म्हणून नियम तोडण्याची संख्या कमी होईल अशी शक्यता आहे.

कोणत्या नियमांवर कारवाई होऊ शकते?

नवीन व्यवस्था लागू झाल्याने स्थानिक पोलिसांकडून हेल्मेट न वापरता वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, ओव्हरस्पीडिंग आणि रेड सिग्नल जंप करणं यांसारख्या उल्लंघनांवर कारवाई होऊ शकते. या निर्णयामुळे ट्रॅफिक पोलिसांवरील कामाचा ताण कमी होण्यासोबतच दिल्लीतल्या वाहतूक नियमांची अंमलबजावणी जास्त व्यापक आणि कडक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीचा मोर्चा- वर्षा गायकवाड

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT