Sakshi Sunil Jadhav
हॉटेलमध्ये उच्च दर्जाच्या कॉटनच्या चादरी वापरल्या जातात. लांब तंतूंचे कापड सतत धूतल्यानंतरही मऊ राहायला मदत होते.
पांढऱ्या बेडशीटसोबत रंगीत कपडे धुवू नका. रंग लागण्याची शक्यता कमी करण्यासाठी पांढऱ्या चादरी स्वतंत्र धुणं योग्य ठरेल.
जास्त उष्ण पाण्यामुळे चादरीच्या तंतूंना नुकसान होऊ शकतं. त्यामुळे धुण्याआधी चादरीवरच्या केअरलेबल वरच्या सूचना तपासा.
चहा, कॉफी, घाम किंवा जेवणाचे डाग पांढऱ्या चादरीवर लगेच दिसतात. फॅब्रिकला योग्य असल्यास ऑक्सिजन बेस्ड ब्लीच वापरता येऊ शकतं.
जास्त उष्णतेमुळे चादर आकसण्यास आणि फॅब्रिक खराब होण्यास सुरुवात होऊ शकते. चादर सुकल्यानंतर ड्रायरमधून लगेच बाहेर काढा.
चादर बाहेर काढल्यानंतर ती व्यवस्थित झटकून पसरवा. यामुळे तयार झालेल्या अनेक छोट्या सिलवटी कमी होण्यास मदत होते.
चादरीत घाम, बॉडी ऑइल आणि डिटर्जंटचे अवशेष जमा होऊ शकतात. फॅब्रिकच्या केअर लेबलनुसार बेकिंग सोडा किंवा पांढरा व्हिनेगर वापरण्याचा विचार करता येतो.
चादरी पूर्णपणे कोरड्या झाल्यानंतरच त्या कपाटात ठेवा. हवेशीर आणि कोरड्या ठिकाणी ठेवल्याने दुर्गंधी आणि बुरशीची समस्या टाळायला मदत होऊ शकते.