LIC Scheme Saam Tv
बिझनेस

LIC Scheme: या सरकारी योजनेत महिलांना दर महिन्याला मिळतात ७००० रुपये, अर्जप्रक्रिया घ्या जाणून

LIC Vima Sakhi Yojana: एलआयसीने महिलांसाठी खास विमा सखी योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला ५००० ते ७००० रुपयांची स्टायपेंड मिळते.

Siddhi Hande

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये महिलांना आर्थिक मदत केली जाते. काही योजनांमध्ये स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्जदेखील दिले जाते. या सर्व योजनांचा उद्देष हाच आहे की, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करते. यासाठीच सरकारी विमा कंपनी एलआयसीनेही नवीन योजना सुरु केली आहे. एलआयसीने महिलांसाठी खास एलआयसी विमा सखी योजना सुरु केली आहे.

केंद्र सरकार आणि LICने मिळून ही योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना LIC एजंट बनण्यासाठी ट्रेनिंग दिली जाते. यासाठी प्रशिक्षण देताना त्यांना ५००० ते ७००० रुपये स्टायपेंड दिली जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या महिला एलआयसी एजंट म्हणून काम करु शकणार आहेत. यातून महिला स्वतः पैसे कमवू शकणार आहेत. १ लाख महिलांना विमा सखी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

वीमा सखी योजना आहे तरी काय? (LIC Vima Sakhi Yojana)

वीमा सखी योजनेचा उद्देष ग्रामीण भागातील किंवा अर्ध-शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. यासाठी काही महिलांना विमा, वित्तीय साक्षरता, कस्टर डिलिंग आणि पॉलिसी विक्रीसाठी ट्रेनिंग दिली जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विमा सखी सर्टिफिकेट आणि LIC एजंट कोड दिला जातो.

एलआयसीच्या या ट्रेनिंगदरम्यान ५००० ते ७००० रुपये स्टायपेंड दिली जाते. ट्रेनिंगनंतर महिला काम करण्यास सुरुवात करतात. त्यांना कमिशन आणि इन्सेटिव्हच्या रुपात कमाई होते. या योजनेत पहिल्या वर्षात ४८००० रुपयांची अतिरिक्त कमाई केली जाते.

अर्ज कोणी करावा?

फक्त महिला या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

१८ ते ७० वयोगटातील महिला योजनेसाठी अर्ज करु शकतात.

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे.

अर्ज कुठे करावा?

तुम्हाला एलआयसीच्या या योजनेसठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. याचसोबत तुम्ही CSC पोर्टलवर जाऊन अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

SCROLL FOR NEXT