LIC Scheme Saam Tv
बिझनेस

LIC Scheme: एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १२००० रुपयांची पेन्शन मिळवा; LIC ची जबरदस्त योजना

LIC Smart Pension Plan: एलआयसीच्या स्मार्ट पेन्शन प्लानमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे. या योजनेत फक्त एकदाच गुंतवणूक करायची आहे.

Siddhi Hande

तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहावे, यासाठी प्रत्येकजण बचत करत असतात. जर तुम्हालाही भविष्य सुरक्षित करायचे असेल तर एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करा. एलआयसी स्मार्ट पेन्शन प्लानमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही आयुष्यभर पेन्शन मिळवू शकतात. ही एक प्रिमियम योजना आहे. यात एका गुंतवणूकीवर तुम्ही आयुष्यभर परतावा मिळवू शकतात.

एलआयसी स्मार्ट पेन्शन योजनेत (LIC Smart Pension Scheme) सिंगल आणि जॉइंट अकाउंट उघडू शकतात. या योजनेत तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे.यामुळे सेवानिवृत्तीनंतर तुमचे आयुष्य सुरक्षित होणार आहे.

एलआयसी स्मार्ट पेन्शन प्लानसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करु शकतात. याशिवाय कॉमन सर्विस सेंटरवर जाऊनदेखील खरेदी करु शकतात.

एलआयसी स्मार्ट पेन्शन योजनेचा (Scheme) उद्देश असा आहे की, सेवानिवृत्तीनंतर सर्वांना रेग्युलर इन्कम मिळावा, या योजनेत तुम्हाला एकदाच पैसे भरायचे आहे. या योजनेत तुम्हाला कमीत कमी १ लाख रुपये गुंतवायचे आहे. पती-पत्नी जॉइंट अकाउंट उघडू शकतात.जास्तीत जास्त तुम्ही कितीही पैसे भरु शकतात. तुम्ही जमा केलेल्या रक्कमेवर सेवानिवृत्तीनंतर मिळणार पेन्शन अवलंबून असते.

एलआयसी स्मार्ट पेन्शन योजनेत तुम्ही लोनदेखील घेऊ शकतात. ही पॉलिसी सुरु केल्यानंतर ३ महिन्यात तुम्हाला लोन दिले जाते. या योजनेत १८ पेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. जर कोणत्याही पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर ही पेन्शनची रक्कम नॉमिनीला दिली जाते.

या योजनेत तुम्ही कमीत कमी १००० रुपयांची पेन्शन मिळवू शकतात. तुम्ही गुंतवलेल्या रक्कमेवर ही पेन्शन अवलंबून असते. यामध्ये महिन्याला १००० रुपये, तीन महिन्याला ३००० रुपये, सहा महिन्याला ६००० रुपये तर वर्षाला १२००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT