LIC ची न्यू जीवन आनंद पॉलिसी
दररोज ४५ रुपये गुंतवा अन् २५ लाख मिळवा
योजनेत मिळतो जबरदस्त फायदा
प्रत्येकाला आपल्या भविष्याची काळजी असते. भविष्यात कधीही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून आतापासून बचत करायला हवी. तुम्ही जर आतापासूनच पैशांची बचत केली तर भविष्यात तुम्हाला खूप फायदा होईल. सरकारने अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. त्यात गुंतवणूक केल्यावर भविष्यात खूप फायदा होतो. अशीच एक योजना म्हणजे एलआयसी न्यू जीवन आनंद. या योजनेत तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात.
एलआयसी न्यू जीवन आनंद पॉलिसीत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला लाइफ इन्श्युरन्सदेखील मिळतो. या योजनेत तुम्हाला रोज ४५ रुपये गुंतवायचे आहेत. तुम्हाला भविष्यात २५ लाख रुपये मिळू शकतात. एलआयसीच्या न्यू जीवन आनंद पॉलिसी हा एका एंडोमेंट प्लान आहे. यामध्ये सेव्हिंग आणि इन्श्युरन्सचा दोघांचाही फायदा मिळतो.
दररोज ४५ रुपये गुंतवा (Invest Daily 45 Rupees and Get 25 Lakh Rupees)
एलआयसी न्यू जीवन आनंद पॉलिसीत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबात वीमा कव्हर मिळतो. तुम्ही दररोज ४५ रुपये गुंतवायचे आहेत. महिन्याला १३०० ते १४०० रुपये मिळणार आहे. तुम्ही जर ३० ते ३५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला जवळपास २५ लाख रुपये मिळू शकतात. ही रक्कम तुम्ही किती कालावधीसाठी गुंतवणूक करतायत, तुमचे वय आणि बोनसवर आधारित असते.
एलआयसीच्या या पॉलिसीत गुंतवणूक केल्यावर मॅच्युरिटीनंतर पूर्ण फंड मिळणार आहे. याचसोबत विमा कव्हरदेखील मिळणार आहे.मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावरही तुम्हाला विमा कव्हर मिळणार आहे. याचसोबत या योजनेत पॉलिसीधारकांना बोनसदेखील मिळतो. त्यामुळे मॅच्युरिटीनंतरची रक्कम वाढते. यावेळी तुम्ही लोनदेखील घेऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.