LIC Policy Google
बिझनेस

LIC Policy: गुंतवणूकदार होणार मालामाल; LICच्या योजनेतून मिळेल दमदार परतावा, जाणून घ्या FD योजनेबाबत सर्वकाही

Investment Plan: LICची नवजीवन श्री योजना ही एकदाच प्रीमियम भरायची सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. यात 8.5% निश्चित व्याजदर, विमा संरक्षण आणि करसवलतीचा लाभ मिळतो.

Sakshi Sunil Jadhav

जर तुम्ही अशी गुंतवणूक योजना शोधत असाल ज्यात सुरक्षितसोबत भरघोस Returns मिळतील, तर LICची नवजीवन श्री योजना (Nav Jeevan Shree Plan 911) तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. ही एक सिंगल प्रीमियम लाइफ इन्शुरन्स योजना आहे. ज्यात फक्त एकदाच प्रीमियम भरायचा असतो आणि त्यानंतर ही योजना तुमच्या गुंतवणुकीसह विमा संरक्षणाचाही लाभ देतात. योजनेची खास वैशिष्ट्ये

योजनेची खास वैशिष्ट्ये

LIC Nav Jeevan Shree Plan 911 ही योजना विशेषतः त्या लोकांसाठी तयार करण्यात आली आहे जे दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणूक करणार आहेत. या योजनेत तुम्हाला लाइफ कव्हर सोबतच निश्चित परताव्याचाही फायदा मिळतो. एकदा प्रीमियम भरल्यावर पुढे कोणतीही हप्त्याची गरज राहत नाही.

योजनेचा कालावधी 10 ते 25 वर्षांदरम्यान निवडता येतो. प्रीमियमची रक्कम ही तुमच्या वय, विमा रक्कम आणि निवडलेल्या कालावधीनुसार ठरते. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती 35 वर्षांची असेल आणि तिला 10 लाख रुपयांचे कव्हरेज घ्यायचे असेल, तर त्याला एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि संपूर्ण कालावधीसाठी बीमा संरक्षण कायम राहील.

मृत्यू लाभ आणि मॅच्युरिटी बेनिफिट

जर पॉलिसीधारक पूर्ण कालावधीपर्यंत जिवंत राहिला, तर कालावधी पूर्ण झाल्यावर त्याला मॅच्युरिटी अमाऊंट मिळेल. यात बेसिक सम एश्योर्ड आणि LICकडून जाहीर होणारा बोनस यांचा समावेश असतो. म्हणजेच, ही योजना फिक्स्ड डिपॉझिटसारखा परतावा देते. पण त्यात विमा सुरक्षा देखील मिळतो.

जर पॉलिसीधारकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला डेथ बेनिफिट म्हणून संपूर्ण विमा रक्कम आणि बोनस मिळतो. त्यामुळे ही योजना आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये मिळणारे काही अतिरिक्त फायदे म्हणजे कर सवलत (Tax Benefits) आयकर कायद्यातील धारा 80C आणि 10(10D) अंतर्गत सूट मिळते. सरकारी विश्वास आणि स्थिर परतावा, ज्यामुळे गुंतवणूक सुरक्षित राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT