LIC Jeevan Pragati Plan Saam TV
बिझनेस

LIC ची ही Scheme तुम्हाला बनू शकते लखपती, फक्त 200 रुपये वाचून मिळू शकतात 28 लाख; काय आहे योजना?

LIC Jeevan Pragati Plan: एलआयसीच्या या योजनेचे नाव जीवन प्रगती योजना आहे. या योजनेत तुम्ही फक्त 200 रुपयांची बचत करून 28 लाख रुपयांचा लाभ मिळवू शकता. ही एक नॉन-लिंक्ड लाभ योजना आहे.

Satish Kengar

LIC Jeevan Pragati Plan:

देशातील अनेक लोक एलआयसीकडे विश्वासार्ह आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून पाहतात. यामुळेच LIC च्या अनेक योजना देशभरात खूप लोकप्रिय आहेत. एलआयसी विविध उत्पन्न गटांचा विचार करून अनेक योजना चालवत आहे. यातच आज आम्ही तुम्हाला LIC च्या एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत.

एलआयसीच्या या योजनेचे नाव जीवन प्रगती योजना आहे. या योजनेत तुम्ही फक्त 200 रुपयांची बचत करून 28 लाख रुपयांचा लाभ मिळवू शकता. ही एक नॉन-लिंक्ड लाभ योजना आहे. जी तुम्हाला संरक्षण आणि बचत दोन्ही देते. या योजनेत गुंतवणूकदारांचे रिस्क कव्हर दर पाच वर्षांनी वाढते. अशातच तुम्ही 200 रुपयांची बचत करून 28 लाख रुपये कसे मिळू शकता, हे समजून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एलआयसी जीवन प्रगती योजनेत नोंदणी केल्यानंतर तुम्हाला दररोज 200 रुपये वाचवावे लागेल. अशातच तुम्हाला एका महिन्यात सुमारे 6 हजार रुपये या योजनेत गुंतवावे लागतील. अशा पद्धतीने तुमचे वार्षिक 72 हजार रुपये जमा होतील.  (Latest Marathi News)

तुम्हाला एलआयसीच्या जीवन प्रगती योजनेत वार्षिक आधारावर 72 हजार रुपये गुंतवावे लागतील. या योजनेत 20 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी 28 लाख रुपये मिळतील. याशिवाय तुम्हाला रिस्क कव्हरचाही लाभ मिळेल.

दरम्यान, देशातील अनेक लोक एलआयसीच्या जीवन प्रगती योजनेत गुंतवणूक करत आहेत. यातच जर तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगली योजना शोधत असाल तर जीवन प्रगती योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.

डिस्क्लेमर: म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे बाजाराच्या जोखमीच्या अधीन असतात. यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. जर तुम्ही व्यवस्थित माहिती न घेताना म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली. तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा बाजाराच्या व्यवहारावर अवलंबून असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT