LIC Policy Saam Tv
बिझनेस

LIC Policy: दररोज फक्त ४५ गुंतवा अन् २५ लाख मिळवा, LIC च्या खास पॉलिसीबद्दल जाणून घ्या

LIC Jeevan Anand Policy: एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. दररोज ४५ रुपये गुंतवा अन् २५ लाख तुम्ही या योजनेत मिळवू शकतात.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्याला भविष्यात पैशाची अडचण भासू नये. तसेच आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. तुम्ही जर योजना, एफडी किंवा एलआयसीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित होईल. एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्येदेखील तुम्ही गुंतवणूक करु शकतात.

एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे. जीवन आनंद पॉलिसीमध्ये तुम्ही दररोज ४५ रुपयांची गुंतवणूक करुन २५ लाख रुपये मिळवू शकतात. (LIC Policy)

एलआयसीची जीवन आनंद ही एक टर्म पॉलिसी आहे. या योजनेत तुम्ही कितीही कालावधीसाठी गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला कमीत कमी १ लाख रुपये एश्योर्ड करायचे असतात. त्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त रक्कम गुंतवू शकतात.

एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीत रोज ४५ रुपये म्हणजेच १३५८ रुपये महिन्याला दमा करणार आहे. या योजनेत तुम्हाला मॅच्युरिटीच्या कालावधीनंतर २५ लाख रुपये मिळू शकतात.

जर तुम्ही ३५ वर्षासाठी रोज ४५ रुपये भरले तर मॅच्युरिटीननंतर २५ लाख रुपये मिळतील. तुम्हाला महिन्याला १६,३०० रुपयांची गुंतवणूक करायची आहे. (LIC Jeevan Anand Policy)

तुमच्या पॉलिसीत तुम्ही ३५ वर्षासाठी पैसे जमा केल्यास ५,७०,००० रुपये जमा होतात. यातील ५ लाख रुपये एश्योर्ड असतात. त्यावर ८.६० लाखांचा बोनस मिळते. तर फायनल बोनस ११.५० लाख रुपये मिळतात. या योजनेत तुम्हाला कर सूटदेखील मिळते. या योजनेत दोन वेळा बोनस दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT