Lenskart Controversy Update साम टीव्ही मराठी
बिझनेस

TCS नंतर Lenskart मध्ये 'ड्रेस कोड'वरून वाद; हिजाब चालतो, पण टिकली लावण्यावर बंदी? CEO ने दिले स्पष्टीकरण

Lenskart dress code rules Controversy : लेन्सकार्टमधील ड्रेस कोड वादामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.

Namdeo Kumbhar

Lenskart Controversy Update : नाशिकमधील TCS कंपनीतील कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हा वाद ताजा असतानाच आता लेन्सकार्टमधील ड्रेस कोडमुळे सोशल मीडियावर गदारोळ उडाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही कर्मचाऱ्यांनी लेन्सकार्टच्या ड्रेस कोडवर नाराजी व्यक्त केली आहे. एका विशिष्ट ड्रेस कोडसाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केल्याचा दावा केला जात आहे. "हिजाब-पगडी चालते, पण टिकली-टिळा लावण्यावर बंदी का?" असा सवाल काही जणांनी उपस्थित केला आहे. हा वाद एका व्हायरल स्क्रीनशॉटमुळे निर्माण झाला असून यावर लेन्सकार्टचे सीईओ पियुष बन्सल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पारंपरिक किंवा धार्मिक कपडे घालताना अस्वस्थ वाटेल असे वातावरण लेन्सकार्टमध्ये निर्माण केले जात असल्याचा आरोपही काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर केला आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पेहरावाबाबत आणि युनिफॉर्मसंदर्भात काही नियम निश्चित केल्याचा दावा केला जातोय. त्या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना हिजाब किंवा मास्क घालण्याची परवानगी दिली गेली, मात्र टिकली आणि टिळा लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे नागरिक संतापले असून हा 'धार्मिक भेदभाव' असल्याचे बोलले जात आहे.

एका स्क्रीनशॉटमुळे सोशल मीडियावर लेन्सकार्टबाबतचा हा वाद सुरू झाला. नेटकऱ्यांनी संस्थापक पियुष बन्सल यांच्यावर चुकीची माहिती दिल्याचा आरोपही केला आहे. लोकांचा संताप आणि वाढती टीका पाहिल्यानंतर बन्सल यांनी यावर स्पष्टीकरण दिले. कंपनीकडून या प्रकरणावर अधिकृत निवेदन जारी करण्यात आले असून सोशल मीडियावर केले जाणारे दावे त्यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच, सर्व कर्मचाऱ्यांसाठी समानता आणि कामाचे चांगले वातावरण राखण्यासाठी कंपनी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नेमका वाद का सुरू झाला?

व्हायरल झालेल्या मेसेजमधील दाव्यानुसार, जर एखादी महिला कर्मचारी कुंकू लावत असेल, तर ते अगदी कमी प्रमाणात असावे आणि कपाळावर ठळकपणे दिसू नये, असे म्हटले होते. तसेच टिकली लावण्यासही परवानगी नव्हती. धार्मिक किंवा पवित्र धागे (गंडे-दोरे) मनगटावर बांधण्यासही मज्जाव करण्यात आल्याचे या मेसेजमध्ये नमूद होते. हिजाब घालण्यास परवानगी असली तरी त्यावर काही अटी घालण्यात आल्या होत्या. उदा. हिजाब काळ्या रंगाचा आणि मध्यम लांबीचा असावा, ज्याने कंपनीचा युनिफॉर्म झाकला जाणार नाही. तसेच दुकानात 'बुरखा' घालण्यास परवानगी नाही, असेही यात म्हटले होते. या नियमावलीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर लेन्सकार्टवर टीकेची झोड उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT