Lek Ladki Yojana saam tv
बिझनेस

Lek Ladki Yojana: लेक लाडकी योजनेबाबत मोठी बातमी! आता घरबसल्या करता येणार अर्ज; सरकारने सुरू केली नवी सुविधा

Lek Ladki Scheme Online Apply : लेक लाडकी योजनेसाठी आता महाडीबीटी २.० पोर्टलवरून घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लेक लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रोसेस जास्त सोपी होणार आहे. राज्य सरकारने लेक लाडकी योजनेसाठी महाडीबीटी २.० पोर्टलच्या माध्यमातून थेट ऑनलाइन कर्ज करण्याआधी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालयांचे किंवा अंगणवाडी केंद्रांचे हेलपाटे मारण्याची गरज कमी होईल.

महाडीबीटी २.० पोर्टलवरून करता येणार अर्ज

लेक लाडकी योजनेसाठी याआधी काही भागांमध्ये अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून अर्जाच्या प्रोसेसमध्ये अडचणी येत होत्या. महत्त्वाचं म्हणजे, ज्या ठिकाणी अंगणवाडी केंद्र कार्यरत नाहीत, तिथल्या पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत होता. पण आता ऑनलाइन अर्ज सुविधेमुळे ही अडचण दूर व्हायला सुरूवात होईल.

राज्यातल्या कोणत्याही भागातल्या पात्र लाभार्थ्यांना महाडीबीटी २.० पोर्टलवरून अर्ज करता येईल. तसेच अर्ज केल्यानंतर त्याचे स्टेटस तपासता येतील. अर्ज मंजूर झाला आहे की रखडलेला आहे, याची माहितीही ऑनलाइन पाहता येईल.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा याची माहिती दिली होती. या नव्या सुविधेमुळे अर्ज नोंदणीपासून ते छाननी, मंजुरी आणि लाभ वितरणापर्यंतची संपूर्ण प्रोसेस ऑनलाइन होईल. विशेष म्हणजे, अर्जासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.

आतापर्यंत २ लाख ९८ हजारांहून जास्त लाभार्थ्यांना लाभ

लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणारी आर्थिक मदत थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २ लाख ९८ हजार ६९५ लाभार्थ्यांना योजनेचा पहिला लाभ मिळालेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळात मॅरेथॉनसाठी पुणे महापालिकेचे ५० लाख? रवींद्र धंगेकरांचा आयुक्तांना थेट सवाल

Maharashtra Politics: ​2029 मध्ये तटकरे कुटुंबाला दणका? गोगावलेंच्या वक्तव्याने रायगडच्या राजकारणात खळबळ

Skin Care: पिंपल्स आणि त्वचेची जळजळ होईल कमी! रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'हे' खास तेल, मिळेल ग्लोईंग फेस

Kitchen Tips : फ्रिजच्या दरवाजात पेपर टॉवेलचा रोल का ठेवतात? जाणून घ्या या छोट्या ट्रिकचे मोठे फायदे; स्वच्छतेसाठी होईल उपयोग

LPG Cylinder Price: आज रविवारी गॅस सिलिंडर महागला की स्वस्त झाला? मुंबई, दिल्लीसह पाहा इतर शहरांतले नवे दर

SCROLL FOR NEXT