Petrol Diesl Today Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesl Rate (14th May 2024): मेगा सिटीमध्ये पेट्रोल डिझेल महाग की स्वस्त ;जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesl Today Price: पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सर्वसामान्यांसाठी कायम डोकेदुखी विषय ठरत असतो. इंधनाच्या जेव्हा किंमती वाढतात त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या इतर वस्तूंवरही होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सर्वसामान्यांसाठी कायम डोकेदुखी(headache) विषय ठरत असतो. इंधनाच्या जेव्हा किंमती वाढतात त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या इतर वस्तूंवरही होतो. मात्र काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कधी चढ -उतार होताना दिसून येत आहे.

दररोज देशभरात सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर होताता. त्याचप्रमाणेही आजचे अर्थात १४ मे २०२४ रोजीचे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर झालेले आहेत.

मेगा सिटीमध्ये आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर मिळत आहे. तर आज डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईमध्ये(Mumbai) पेट्रोल १०४.२१ रुपये आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटरने मिळत आहे.

कोलकत्तामध्ये पेट्रोल १०३.९४ रुपये प्रति लिटर आहे. तसेच डिझेल ९०.७६ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

तर चेन्नईमधील पेट्रोल डिझेलचे दर देखील आहेत तसेच आहे. पेट्रोल १००.७५ आणि डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटर आहे.

राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 104.21 रुपये/प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये / प्रति लिटर

पुणे

पेट्रोल 104.40 रुपये/प्रति लिटर तर डिझेल 90.92 रुपये / प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 104.91 रुपये/प्रति लिटर तर डिझेल 91.41 रुपये / प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 103.98 रुपये/प्रति लिटर तर डिझेल 90.52 रुपये / प्रति लिटर

घरबसल्या जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही घरबसल्या देखील जाणून घेऊ शकता. एसएमएसद्वारे तुम्हाला तुमच्या शहरातील दर समजतील. यासाठी तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असल्यास RSP सोबत सिटी कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एक एसएमएस पाठवावा लागेल.

बीपीसीएलचे ग्राहक असल्यास तुम्ही RSP लिहून आणि 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या रोजच्या अपडेट तुम्हाला तुमच्या शहरानुसार तुमच्या मोबाईल फोनवर (Mobile) एसएमएसद्वारे मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात भीषण आग; चारा व शेती साहित्य जळून खाक

Crime News: ऑनलाईन गेमिंगच्या नादात आयुष्य उद्ध्वस्त, गळफास घेत संपवलं आयुष्य; पोलिसांना सापडली सुसाईड नोट

Maharashtra politics : शिंदेंकडून धक्कातंत्राचा वापर, दिग्गज नेत्याला दिली आमदारकीची ऑफर, विधान परिषद निवडणुकीत ट्वीस्ट

खळबळजनक! हायकोर्टाच्या वकिलाने हॉटेलच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं

Namita Thapar: अभिमान आहे हिंदू असल्याचा...! नमाजचे फायदे सांगितल्यावर ट्रोल झालेल्या नमिता थापरचं सडेतोड उत्तर

SCROLL FOR NEXT