Gold Silver Rate (13th September) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (13th September): खरेदीदारांसाठी गोल्डन चान्स! सोन्या चांदीच्या भावात नरमाई, जाणून घ्या तुमच्या राज्यातील आजचा दर

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (13th September):

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्या-चांदीच्या वाढत्या दरामुळे खरेदीदारांसाठी हा काळ चांगला आहे. अमेरिकेतील वाढत्या महागाईवर नियंत्रण होताना दिसून येत आहे, त्यामुळे धातूच्या किमतीवर परिणाम झालेला पाहायला मिळतो.

डॉलरच्या किंमती घसरल्या की, सोन्या-चांदीच्या भावात घट झालेली पाहायला मिळाली आहे. जाणून घेऊया मुंबईसह इतर राज्यात सोन्याचा किती भाव आहे.

1. आजचा सोन्याचा घसरलेला भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार सकाळच्या सत्रानुसार काल २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४९९ रुपये तर २४ कॅरेटनुसार ५,९९९ रुपये मोजावे लागले होते. तर आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४६५ रुपये तर २४ कॅरेटनुसार ५९,६०० रुपये मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या भावात घट झालेली पाहायला मिळाली आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल सकाळच्या सत्रात १० ग्रॅमसाठी ७४५ रुपये मोजावे लागले तर आज १० ग्रॅमसाठी ७३५ रुपये मोजावे लागणार आहे. यामुळे आज खरेदीदारांचा कल सोन्या-चांदीसाठी अधिक दिसेल.

3. 24 कॅरेटनुसार मुंबई-पुण्यातला 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार  मुंबईमध्ये  (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 59,450 प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात  (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 59,450 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 59,480 रुपये मोजावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT