Gold Silver Rate (3rd August) Saam tv
बिझनेस

Gold Silver Rate (3rd August): गोल्डन चान्स! सोन्याचा भाव दणकून आपटला, चांदीच्या भावातही घसरण; जाणून घ्या आजचे दर

Today's 3rd August Gold Silver Rate In Maharashtra : अमेरिकन डॉलरमुळे सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (3rd August):

सोन्या-चांदीने मागच्या महिन्यात उच्चांकाची पातळी गाठली होती. या दरात सातत्त्याने चढ-उतार होत असते. मे आणि जून महिन्यानंतर जुलै महिन्यात सोन्या चांदीच्या भावात नवीन रेकॉर्ड करता आला नाही.

अशातच ऑगस्ट महिना सुरु होताच सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. अमेरिकन डॉलरमुळे सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. परंतु, आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. जाणून घेऊया आज १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील.

1. आजचा सोन्याचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल २ ऑगस्टला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55,250 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,260 रुपये मोजावे लागले आहे. तर आज ३ ऑगस्टला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55,100 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,100 रुपये मोजावे लागणार आहे. आज २४ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव १०० रुपयांनी घसरला आहे.

2. चांदीचा भाव

आज गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार १० ग्रॅम चांदीसाठी ७५० रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे खरेदीदारांची गर्दी आज पाहायला मिळेल.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाईट्सनुसार मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेटसाठी 59,950 प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर 59,950 रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 59,950 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर 59,980 रुपये आहे.

4. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

SCROLL FOR NEXT