कोमल दामुद्रे
प्रेम असो वा लग्न, नातं सदैव मजबूत असायला हवं, जेणेकरून तुमची छोटी छोटी भांडणे नात्यात दूरावा आणणार नाही.
आजकाल नात्यात ब्रेकअप होणे अगदी सामान्य झाले आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात घटस्फोटही सामान्य आहे. नाती समजून घ्यायला लोक वेळ देत नाहीत.
अनेक वेळा असं होतं की तुमच्या काही सवयीच नातं बिघडवतात किंवा संपवतात. या सवयींमुळे जोडीदार रागावतो आणि मग नाते तुटते.
तुम्हालाही या सवयी आहेत का? तर आजच त्या दुरुस्त करा अन्यथा, तुमचे नाते तुटू शकते. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रत्येक गोष्टीत प्रतिबंध करत असाल तर त्याला ते अजिबात आवडणार नाही. त्यामुळे ही सवय बदला.
तुम्ही तुमच्या जोडीदाराची तुलना दुसऱ्याच्या नवऱ्याशी किंवा प्रियकराशी करत असाल तर तेही चुकीचे आहे. हे कोणालाच आवडत नाही.
कमी बोलणारी अनेक जोडपी आहेत. जोडप्यांमध्ये संवाद साधणे खूप महत्वाचे आहे. कमी बोलणं झालं की नातं तुटतं.
तुमच्या मित्रांसमोर किंवा नातेवाईकांसमोर तुमच्या जोडीदाराचा अपमान करू नका किंवा लाजवू नका. यामुळे त्यांना वाईट वाटू शकते.
तुमच्या जोडीदारावर विनाकारण संशय घेऊ नका किंवा हेरगिरी करू नका. ती कोणाला भेटत आहे किंवा बोलत आहे. प्रत्येकाचे स्वतःचे वैयक्तिक आयुष्य असते.
आपल्या जोडीदाराबद्दल त्याच्या कुटुंबाविषयी वाईट बोलू नका. यामुळे तुमच्या दोघांमध्ये दुरावा येईल तसेच तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होईल.