Gold Silver Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (26 July): सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीचे भावही वधारले; जाणून घ्या मुंबईतील आजचे दर

Today's (26 July) Gold Silver Price In Maharashtra : जाणून घेऊया १० ग्रॅम सोन्यासाठी मुंबईत किती पैसे मोजावे लागतील.

कोमल दामुद्रे

Latest Update on Gold Silver Rate in Maharashtra (26 July 2023):

अधिक मास असल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. जुलै महिन्यात सोन्याच्या दराने उच्चकांची पातळी गाठली. मे आणि जून महिन्यानंतर पहिल्यांदा किमती कमी झाल्या होत्या. परंतु, मागच्या २० दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ सुरुच आहे.

काल सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण झाली होती. त्यामुळे खरेदीदारांचा कल हा जास्त प्रमाणात पाहायला मिळाला. या महिन्यात सोन्याने ६० हजारांचा टप्पा पार केला असून मागच्या आठवड्यात यात फारसे बदल झालेले नाही. जाणून घेऊया १० ग्रॅम सोन्यासाठी मुंबईत किती पैसे मोजावे लागतील.

1. आजचा सोन्याचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाईट्नुसार काल २५ जुलैला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55,150 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,150 रुपये मोजावे लागले होते तर आज २६ जुलैला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55,300 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,320 रुपये मोजावे लागणार आहे. मागच्या भावानुसार आज २२ कॅरेटच्या भावात १५० रुपयांनी वाढ झाली तर २४ कॅरेटच्या भावात १७० रुपयांनी (Money) वाढ झाली आहे.

2. चांदीचा भाव

अधिक मासात ग्राहकांचा कल हा सोने-चांदी खरेदी करण्याकडे अधिक असतो. अशातच गुड रिटन्सच्या वेबसाईट्सनुसार २६ जुलैला चांदीच्या (silver) १० ग्रॅम भावासाठी 774 रुपये मोजावे लागले तर आज 1 किलो चांदीसाठी 77,400 रुपये मोजावे लागणार आहे.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - 60,570 रुपये

  • दिल्ली - 60,320 रुपये

  • हैदराबाद - 60,160 रुपये

  • कोलकत्ता - 60,160 रुपये

  • लखनऊ - 60,320 रुपये

  • मुंबई - 60,160 रुपये

  • नागपूर - 60,160 रुपये

  • पुणे - 60,160 रुपये

4. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : ईईssssss....आईस्क्रीममध्ये आढळली सापाच्या पिल्लाएवढी कीड, खाण्याआधी दहा वेळा विचार करा!

Moti Mangalsutra Designs: वटपौर्णिमेला खास लूक हवा? मोती मंगळसूत्राच्या या 7 ट्रेंडी सुंदर डिझाइन्स नक्की पाहा

Maharashtra News Live Update: परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

Chanakya Niti: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

SCROLL FOR NEXT