Lakhpati Didi Yojana Saam Tv
बिझनेस

Lakhpati Didi Yojana : व्यवसायासाठी सरकारकडून महिलांना मिळते ५ लाखांचं बिनव्याजी कर्ज; काय आहे योजना?

Lakhpati Didi Yojana: केंद्र सरकारने महिलांसाठी लखपती दीदी योजना सुरु केली आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते.

Siddhi Hande

केंद्र सरकारने आतापर्यंत महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याच्या उद्देशातून या योजना राबवण्यात आली आहे. केंद्र सरकारची अशीच एक योजना म्हणजे लखपती दीदी योजना. या योजनेअंतर्गत महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते.

केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना ५ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही. त्यामुळे महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. (Lakpati Didi Scheme)

लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम तर केले जाते. त्याचसोबत बिझनेसचा विस्तार करण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंगदेखील दिले जाते.

२०२३ मध्ये केंद्र सरकारने लखपती दीदी योजना सुरु केली होती. आतापर्यंत १ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेत महिलांना लोनचे पैसे त्याचसोबत ट्रेनिंगदेखील दिले जाते. या कर्जावर कोणतेही व्याज द्यावे लागत नाही. (Lakhpati Didi )

लखपती दीदी योजनेअंतर्गत १८ ते ५० वयोगटातील कोणतीही महिला अर्ज करु शकते. महिला ही देशातील कोणत्याही राज्याची सदस्य असावी. व्यवसाय सुरु करण्यासाठी महिलांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जवळच्या स्वयं-सहायता गट कार्यालयात दिले पाहिजे. अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साइज फोटो द्यावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगटासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT