Lado Laxmi Yojana Saam Yb
बिझनेस

Lado Laksmi Yojana: महिलांसाठी खास योजना! दर महिन्याला मिळतात ₹२१००; लाडो लक्ष्मी योजना आहे तरी काय?

Lado Lakshmi Yojana: महिलांसाठी खास लाडो लक्ष्मी योजना सुरु करण्यात आली आहे. हरियाणातील महिला या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, या दृष्टीने ही योजना सुरु करण्यात आली आहे.

Siddhi Hande

हरियाणा सरकारची महिलांसाठी खास योजना

महिलांना दर महिन्याला मिळतात २१०० रुपये

लाडो लक्ष्मी योजनेची पात्रता काय?

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. केंद्र सरकारसोबत विविध राज्य सरकारनेही योजना राबवल्या आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे. तशीच योजना हरियाणा सरकारनेही राबवली आहे. हरियाणा सरकारने महिलांसाठी खास लाडो लक्ष्मी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाते.

लाडो लक्ष्मी योजनेत महिलांना दर महिन्याला २१०० रुपये दिले जातात. राज्यातील सर्व महिलांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यासाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहे.

१ नोव्हेंबर रोजी हरियाणातील महिलांना पहिला हप्ता देण्यात आला होता. १ नोव्हेंबर रोजी ५ लाख २२ हजार १६२ महिलांच्या खात्यात प्रत्येकी २१०० रुपये पाठवले होते. यानंतर आता महिला दुसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लवकरच हे पैसे दिले जातील असे सांगितले जात आहे.

लाडो लक्ष्मी योजना आहे तरी काय? (What is Lado Laxmi Yojana)

लाडो लक्ष्मी योजना २५ सप्टेंबर २०२५ रोजी सुरु करण्यात आली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनत बीपीएल आणि कमी उत्पन्न असलेल्या महिलांना मदत केली जाते.

कोणाला मिळतो योजनेचा लाभ? (Lado Laxmi Yojana Eligibility)

२३ पेक्षा जास्त वयोगटातील महिलांना योजनेचा लाभ मिळतो. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा कमी असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. या महिला हरियाणाच्या रहिवासी असाव्यात. जर इतर राज्यातील महिला लग्न करुन आल्या असतील तर त्यांचा नवरा १५ वर्षे हरियाणात राहत असावा. जर महिला याआधी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत भाजच्या ३ बड्या नेत्यांची हकालपट्टी, पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

Crime: ६५ वर्षीय महिलेची हत्या, नंतर मृतदेहावर बलात्कार; २४ वर्षांच्या तरुणाचं हैवानी कृत्य

Bank Loan: कर्ज घ्यायचंय? तर कॅरेक्टर ठेवा चांगलं; सिबिलसह तपासलं जाणार तुमचा गुन्हेगारी रेकॉर्ड

Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, आजचा भाव काय? वाचा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे ताजे दर

Gas Leak Safety: घरात गॅसचा वास येत असेल तर, 'या' ५ चुका करू नका, मोठा स्फोट होईल

SCROLL FOR NEXT