Lek Ladki Yojana Saam Tv
बिझनेस

Lek Ladki Yojana: महाराष्ट्रातील लाडक्या लेकींना मिळतात १ लाख १ हजार रुपये; तुम्हाला मिळाले का?

Maharashtra Government Lek Ladki Yojana: महाराष्ट्र सरकारने राज्यातील मुलींसाठी लेक लाडकी योजना राबवली आहे. या योजनेत मुलींना १८ वर्षांची होईपर्यंत १ लाख १ हजार रुपये दिले जातात.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना

मुलींना १८ वर्षांची होईपर्यंत मिळतात १ लाख १ हजार रुपये

हजारो मुलींना मिळतो लाभ

राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे म्हणून सुरु करण्यात आलेल्या लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात १ एप्रिल २०२३ नंतर जन्म झालेल्या ९ हजार ४८२ मुलींना मागील तीन वर्षात ४ कोटी ७४ लाख १० हजार रुपये लाभ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे. तसेच या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुलींना मिळतो १ लाख १ हजार रुपये (Lek Ladki Yojana Get 1 Lakh 1 Thousand Rupees)

पहिला हप्ता प्रति लाभार्थी रु ५ हजार रुपये देण्यात आला आहे. २०२३-२४ मध्ये १ हजार ४० मुलींना ७० लाख रुपये, सन २०२४-२५ मध्ये ५ हजार ७२० मुलींना २ कोटी ८६ लाख रुपये आणि सन २०२५-२६ मध्ये २ हजार ३६२ मुलींना १ कोटी १८ लाख १० हजार रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे.

मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे,मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलीचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेच्या अटी (Lek Ladki Yojana Eligibility)

लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. लाभार्थीचे बॅकेचे खाते असावे.

कुंटुंबांचे वार्षिक उत्पन १ लाख पेक्षा जास्त नसावे.

ही योजना पिवळया व केशरी शिधापत्रिकाधारक कुंटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या ए‍क अथवा दोन बालिकांसाठी लागू आहे. एक मुलगा व मुलगी असल्यास मुलीला लागू आहे.

मुलीच्या जन्मानंतर रक्कम ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, इयत्ता सातवीत ७ हजार, इयत्ता अकरावीत ८ हजार, मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये असे मिळून १ लाख १ हजार रुपयाचा लाभ देण्यात येतो.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, बालकल्याण सभापती अंकिता पाटील यांनी जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण संतुलित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासोबतच महिला सक्षमीकरणाकरिता प्रभावी योजनांची आखणी करून अंमलबजावणी करण्याचेनिर्देश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) आनंद खंडागळे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातला महिला लैंगिक अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Horror Comedy Movies: 'भूत बंगला' विसरा... हे आहे भारतातील सर्वात बेस्ट 'हॉरर-कॉमेडी' चित्रपट

Amravati Case: "मुलींशी हाय हॅलो नको" तर...; अयानला लव्हगुरुच्या टिप्स; आरोपीनं मुलींना कसं अडकवलं जाळ्यात?

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपासून 'या' ५ राशींचे नशीब पलटणार! माता लक्ष्मीच्या कृपेने घरात येईल 'पैसाच पैसा'

Periods Sweet Cravings : पीरियड्समध्ये गोड खाण्याची इच्छा का होते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या खरं कारण

SCROLL FOR NEXT