Ladki Bahin August Installment Update meta ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! गौरी आगमनाच्यावेळी खात्यात ₹1500 जमा होणार? वाचा...

Ladki Bahin Yojana August Installment latest update : लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता अनेक महिलांना अद्याप मिळालेला नाही. गौैरी आगमनाच्या दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेमध्ये महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडकींच्या खात्यात जमा करण्यात आला होता. मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप अनेक महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे हा पैसा नेमका कधी खात्यात जमा होणार, याकडे लाखो महिलांचं लक्ष लागलं आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या काळात विशेषत: गौरी आगमनाच्या दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये महिलांना आर्थिक मदत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, पुढच्या हप्त्याबाबत मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवर १० सप्टेंबरपर्यंत आवश्यक निधी संबंधित विभागाकडे पाठवण्याची तयारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. निधी पुढे उपलब्ध झाल्यानंतर १६ सप्टेंबरपासून DBTच्या माध्यमातून लाडक्या बहि‍णींच्या खात्यात रक्कम जमा केली जाऊ शकते.

तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे २० सप्टेंबरपर्यंत ऑगस्टचा हप्ता जमा झाला नाही, तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचं सांगितलं जात आहे. तसं झालं तर पात्र महिलांच्या खात्यात एकाच वेळी ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेतल्या अपात्र लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारने KYC प्रोसेस लागू केली होती. त्यानंतर अनेक महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे येणारा हप्ता हा फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंगात ताप असताना आंघोळ करावी का? काय सांगतात तज्ज्ञ?

LPG Cylinder Booking Rule : गॅस सिलिंडर बुकिंगचा नियम पुन्हा बदलला; आता दुसरा सिलिंडर किती दिवसांनी बुक करता येणार?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या ‘चलो मुंबई’च्या घोषणेला महिलांचा पाठिंबा

बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार; सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत युगेंद्र पवारांची एंट्री

Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाला पहिला नवस कुणी केला होता? जाणून घ्या गणरायाची रंजक काहाणी

SCROLL FOR NEXT