Sakshi Sunil Jadhav
SIP म्हणजे Systematic Investment Plan. यामध्ये ठराविक रक्कम नियमितपणे म्युच्युअल फंडात गुंतवली जाते.
Step-Up SIPमध्ये सुरुवातीची मासिक गुंतवणूक ठरवून दरवर्षी त्यात ठराविक टक्क्यांनी वाढ केली जाते.
नोकरी किंवा व्यवसायातून उत्पन्न दरवर्षी वाढत असेल, तर SIPची रक्कमही त्यानुसार वाढवल्याने भविष्यातली गुंतवणूक मोठी होऊ शकते.
उदाहरणामध्ये दरमहा ₹5,000 SIP आणि 20 वर्षांचा कालावधी दाखवण्यात आला आहे. नियमित गुंतवणुकीमुळे दीर्घकाळात मोठी रक्कम तयार करता येते.
SIPमध्ये दरवर्षी 10 टक्क्यांनी गुंतवणूक वाढवल्यावर भविष्यात एकूण गुंतवणूक रक्कम मोठ्या प्रमाणात वाढते.
दिलेल्या उदाहरणात 12% वार्षिक परतावा गृहीत धरला आहे. हा फक्त उदाहरणासाठी वापरलेला अपेक्षित परतावा असून प्रत्यक्ष म्युच्युअल फंड परतावा निश्चित नसतो.
दीर्घकाळ गुंतवणूक केल्याने मिळालेल्या परताव्यावरही पुढे परतावा मिळतो. यामुळे चक्रवाढीचा परिणाम धनसंचय वाढवण्यास मदत करू शकतो.
₹5,000 मासिक SIP 20 वर्षे सुरू ठेवल्यास दिलेल्या उदाहरणानुसार सुमारे ₹49.95 लाख धनसंचय होऊ शकतो; 10% वार्षिक Step-Up केल्यास तो सुमारे ₹99.44 लाख दाखवला आहे.
वरील रक्कम ही चित्रातील उदाहरणावर आधारित आहे. 12% परतावा हमीचा नसतो; म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. तसेच साम टिव्ही याच्याशी समर्थन करीत नाही.