Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! निवडणुकांनंतर अर्जांची पडताळणी होणार

Ladki Bahin Yojana Reverification Started After Election: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर ही पडताळमी केली जाणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर अर्जांची छाननी होणार

१० लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत

लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत जवळपास १० लाख महिलांचे अर्ज बाद केले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता पुन्हा लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे. ही पडताळणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अजून काही महिन्यांनी महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी होणार

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी करुन लाखो महिलांना बाद केले आहेत. तरीही अजूनही अनेक महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे. फक्त ही पडताळणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर होणार आहे.

निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती सरकारला फटका बसू नये, म्हणूनच ही छाननी नंतर केली जाणार आहे. विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर अनेक आरोप केले आहेत. लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद केल्यामुळे अनेक आरोप केले जात आहेत. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुती सरकारला झाला होता. त्यानंतर आता जर महिलांचे अर्ज बाद केले तर याचा फटका बसेल, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर योजनेच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे.

लाडकीला जुलैचा हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेत महिलांना आता जुलैच्या हप्त्याची प्रतिक्षा आहेत. लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता येत्या ८ दिवसांत जमा केला जाऊ शकतो. महिन्याअखेर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा केले जातील.

लाडकी बहीण योजना कधी सुरु झाली?

लाडकी बहीण योजना २९ जून रोजी सुरु झाली आहे. या योजनेला वर्षपूर्ती झाली आहे.

लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी?

लाडकी बहीण योजनेत महिन्याअखेर किंवा ऑगस्टच्या ५ तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात जुलैचे पेसे जमा केले जातील.

अर्जांची पुन्हा पडताळणी कधी होणार?

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. या योजनेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनंतर महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar : हिंगोलीत शरद पवारांची राष्ट्रवादी भुईसपाट, जिल्हाध्यक्षांसह नगरसेवकांनी घड्याळ बांधलं

Maharashtra Live News Update: नागपूर रेल्वे स्टेशनवर माफियांचे आणि कुख्यात हिस्ट्रीशीटरचे वर्चस्व, शिवसेनेचा गंभीर आरोप

Lightning Strike : चिपळूणमध्ये परतीच्या पावसाचे थैमान; वीज पडून तरुणाचा मृत्यू, ६ जण जखमी

YouTube डाऊन! व्हिडीओ पाहण्यात अडथळे, जगभरातील यूजर्स वैतागले; नेमकं काय घडलं?

Shocking: कॉलेजमध्ये कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनींचे गुपचूप व्हिडीओ काढले, ABVP च्या ३ कार्यकर्त्यांना बेड्या

SCROLL FOR NEXT