Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: महिला दिनी लाडक्या बहि‍णींना खुशखबर! ८ तारखेला ३००० रुपये देणार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींना ८ मार्च रोजी ३००० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. लाडक्या बहि‍णींना महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी महिलांना ३००० रुपये मिळणार आहे, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे.

फेब्रुवारी- मार्चचा हप्ता एकत्र

लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात येणार आहे. आदिती तटकरेंनी विधानसभेबाहेर ही मोठी घोषणा केली आहे.

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता दिला नव्हता. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी होती. मात्र, आता मार्च महिन्याचाही हप्ता एकत्र देण्यात येणार आहे . त्यामुळे महिलांना ८ मार्च रोजी ३००० रुपये मिळणार आहे. महिला दिनाचा मूहूर्त साधून महिलांना ३००० रुपये दिले जाणार असल्याची घोषणा आदिती तटकरेंनी केली आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त विशेष सत्र होणार आहे. महिला सभापतींसाठी हे विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ८ मार्चच्या पूर्वसंध्येला महिलांना देण्यात येईल. ५-७ तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे महिलांना ८ मार्च रोजी हे पैसे दिले जाणार आहे. अडीच कोटी महिलांना हा हप्ता मिळणार आहे. मागच्या महिन्यात २ कोटी ३५ लाख महिलांना पैसे मिळाले आहेत.

या महिन्यातही अडीच लाख महिलांना हप्ता मिळणार आहे. महायुतीचं सरकार सक्षम आहे. आम्ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने पुढे सक्षमरित्या कार्यरत ठेवणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता ८ तारखेला येणार आहे. तर मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत कधीही येऊ शकतो. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या हप्त्याची प्रक्रिया सुरु होईल, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा जामीन फेटाळला

Manoj Jarange vs Maharashtra Government: शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांचा जरांगेंवर हल्लाबोल; मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळणार?

SCROLL FOR NEXT