Ladki Bahin Yojana Meta Ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana : टॅक्स भरताय अन् लाडक्या बहीण योजनेचा लाभही घेताय? कारवाई होणार

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांची आता चौकशी होणार आहे.

Siddhi Hande

महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाते. लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे सनोर आले आहे. त्यामुळे महिला व बालविकास विभागाने अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलंच्या कुटुंबातील कोणीही आयकर भरत नसावे. तसेच त्यांच्याकडे चारचाकी वाहन नसावे, असे निकष होते. महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यासाठी परिवहन आणि आयकर विभागाची मदत घेण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईतील तब्बल २२ हजार महिलांचे अर्ज बाद केले आहेत.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न जास्त असेल तर त्यांना योजनेतून बाद केले जाणार आहे. बनावट लाभार्थ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केला आहे. (Ladki Bahin Yojana)

आता तर अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांकडे चारचाकी वाहन आहे की नाही याची चौकशी करणार आहेत. त्यामुळे अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना फटका बसणार आहे. इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठीही पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याअखेर पडताळणी होऊन अपात्र महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाभ सोडण्यासाठी काय करावे?

लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्यासाठी तुम्हाला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल. तर इतर शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्यांना कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे हे सांगावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

SCROLL FOR NEXT