Ladki Bahin Yojana : 'लाडकी'मुळे विकासकामं अडकली? संजय शिरसाट स्पष्टच बोलले | Video

Sanjay Shirsat Statement : राज्यात विकासकामांची कोट्यवधींची बिलं थकीत आहेत. ही बिलं लाडकी बहीण योजनेमुळे थकली असल्याचं बोललं जात आहे. त्यावर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्यात विकासकामांची कोट्यवधींची बिलं थकीत आहेत. त्यामुळे ४ लाख कंत्राटदारांनी आता कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. विविध विभागातील ४ जुलै २०२४ पासूनचे तब्बल ८९ कोटी बिलापोटी थकले आहेत. त्यामुळे कंत्राटदार संघटनांनी ५ फेब्रुवारीपासून काम बंदचा इशारा दिला आहे. हा फटका लाडकी बहीण योजनेमुळे बसत असल्याचं बोललं जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागात ४६ हजार कोटीची थकबाकी आहे. तर जलजीवन विभागात १८ हजार कोटी रुपये थकले आहेत. जलसंधारण विभागात १९ हजार ७०० कोटी. नगरविकास विभाग १ हजार ७०० कोटी. ग्रामविकास विभाग ८ हजार ६०० कोटी रुपये थकेलेल आहेत. या संदर्भात शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिरसाट म्हणाले की, माझी लाडकी बहीण योजना असेल, किंवा अजून कोणती योजना असेल त्यासाठी जवळपास ६० हजार कोटी रुपयांचा ताण सरकारवर आलेला आहे. या मधल्या काळात कंत्राटदारांनी केलेल्या कामाची बिलं थकलेली आहे, हे आम्ही नाकारत नाही. मात्र त्यामुळे काम बंद होईल अशी कोणतीही परिस्थिती नाही, असं संजय शिरसाट यांनी यावर बोलताना सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com