Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी कामाची बातमी, आजच आधार- बँक अकाउंट लिंक करा, ५ हप्त्यांचे ७५०० रुपये खात्यात जमा होणार?

Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेत ज्या महिलांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड आता लिंक केले असेल तर त्यांना मागील महिन्याचे पैसे मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत.या योजनेत लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहेत. या योजनेत आता लवकरच महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहे. या योजनेत ज्या महिलांचे बँक खाते आणि आधार लिंक आहेत त्यांनाच पैसे मिळणार आहेत. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत आधार कार्ड आणि लिंक नसल्याने जवळपास १६ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांना पैसे मिळाले नाहीत. मात्र, त्या महिलांनी आता आधार आणि बँक अकाउंट लिंक केले आहेत. त्यामुळे त्यांना आता पैसे मिळणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. (Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जात आहेत. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर झाल्यानंतर २१०० रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. या योजनेत आता ज्या महिलांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले त्यांना पैसे मिळणार आहेत. मात्र, मागील महिन्याचे हप्ते आले नसतील तर या योजनेत ते रखडलेले पैसे मिळणार का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या योजनेत आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक झाले असेल तर या महिन्यापासून तुम्हाला पैसे मिळणार आहेत.

डिसेंबर महिन्याला हप्ता कधी मिळणार?

डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत महिलांना प्रश्न होता. या योजनेत डिसेंबर महिन्याच्या अखेर महिन्यात येत्या आठवड्यात पैसे येऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

SCROLL FOR NEXT