Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनी केवायसी न केल्यास काय होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana eKYC: लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य आहे. दरम्यान, तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

लाडक्या बहिणींना केवायसी अनिवार्य

केवायसी न केल्यास लाभ बंद

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. तुम्हाला या दोन महिन्यात केवायसी पूर्ण करायची आहे. दरम्यान, जर तुम्ही केवायसी करणे अनिवार्य असल्याचे स्वतः आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.

केवायसी न केल्यास काय होणार? (What Happens if Ladki Bahin Yojane ekyc Not Done)

लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थ्यांना केवायसी करणे बंधनकारक केले आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसीची प्रक्रिया तुम्हाला पारदर्शक पद्धतीने लाभ मिळावा यासाठी आहे. कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी केवायसी केली जात आहे, असंही आदिती तटकरेंनी सांगितलं होतं.

लाडक्या बहि‍णींना केवायसीशिवाय पर्याय नाही (Ajit Pawar on Ladki Bahin Yojana)

अजित पवारांनीही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले होते.लाडक्या बहि‍णींनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करावी. केवायसीची मूदत वाढवून दिली जाईल परंतु केवायसी करावीच लागणार आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता केवायसीशिवाय लाडक्या बहि‍णींकडे पर्याय नाही.

केवायसी करताना अडचणी

लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना महिलांना अनेक अडचणी येत आहेत. कधी वेबसाइट चालत नाहीये तर कधी ओटीपी येत नाहीये. त्यामुळे महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, वेबसाइटवर लोड येत असल्याने ही समस्या येत आहे. याचसोबत नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याने ओटीपी येत नाहीये, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे तुम्ही रात्रीच्या वेळी केवायसी केली तर तुम्हाला अडचण येणार नाही. या कालावधीत अनेक महिला एकाचवेळी केवायसी करत नसतील. त्यामुळे साइटवर लोड येणार नाही आणि तुम्ही सहज केवायसीची प्रोसेस पूर्ण करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celebrity Diwali Party: करीना कपूर ते विजय वर्मा...; मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सेलिब्रिटींचा ग्लॅमर

Mumbai : हायप्रोफाइल सोसायटीत 'काळेकांड'; सेक्रेटरीनं मर्यादा ओलांडल्या, महिलेला तसले मेसेज पाठवायचा, एकदा नव्हे तर दोनदा...

RO-KO : रोहित शर्मा, विराट कोहलीबाबत मोठी भविष्यवाणी! वर्ल्डकप खेळणार की रिटायरमेंट घेणार?

वर्गात फटकारलं, विद्यार्थ्यांची सटकली; शिक्षकाच्या गर्भवती पत्नी अन् २ मुलींना संपवलं, दिवसा रक्तरंजित थरार

Smriti Mandhana: वर्ल्डकपमध्ये स्मृती मानधनाने मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड, इतिहास रचला

SCROLL FOR NEXT