Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: आधार लिंक करा, अन्यथा अर्ज बाद होणार, लाडक्या बहिणींनो ९००० रुपये गमावाल

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नाही त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करुन घ्या.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. या योजनेत महिलांना १५०० रुपये मिळत आहे. आता या योजनेत २१०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहे. दरम्यान, जर तुम्ही आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचे अर्ज बाद होणार आहेत. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे.जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक करण्यास सांगिले होते.

लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत.परंतु ज्या महिलांनी आधार कार्ड लिंक केले नाही त्यांना पैसे मिळाले नाहीत. दरम्यान, ज्या महिलांनी सुरुवातीला अर्ज केले आहेत परंतु त्यांना पैसे आले नाहीत त्यांना पुढच्या महिन्यात एकदम ६ हप्ते येऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही सुरुवातीला फॉर्म भरला असेल अन् आतापर्यंत एकही रुपया तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्हाला ९००० रुपये मिळू शकतात. (Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजना पात्रता

लाडकी बहीण योजनेत महिलांना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर २१०० रुपये दिले जाऊ शकतात. या योजनेचा लाभ घेणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. त्याचसोबत महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपये असावे. तसेच कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावा. आतापर्यंत आधार आणि बँक अकाउंट लिंक नसल्याने १६ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT