Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे ₹१५०० आले नाही; लाभ बंद झाला की काय? या वेबसाइटवर २ मिनिटांत करा चेक

Ladki Bahin Yojana Status Check Online Process: लाडकी बहीण योजनेच्या अनेक लाभार्थ्यांचा लाभ बंद झाला आहे. दरम्यान, तुमचा लाभ बंद झाला की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

पुढचा हप्ता मिळणार की नाही?

पात्र आहात की अपात्र

या वेबसाइटवर चेक करा तुमच्या अर्जाचा स्टेट्स

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत लाखो लाभार्थ्यांना मागच्या अनेक महिन्यांपासून लाभ मिळालेला नाही. अनेक महिला निकषात बसत आहेत, त्यांनी केवायसीदेखील केली तरी त्यांचा लाभ बंद झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत तुम्हालाही मागच्या महिन्याचे पैसे आले नाही तर ही बातमी खास तुमच्यासाठी. मागच्या महिन्याचा लाभ न मिळाल्याने त्यांचा लाभ कायमचा बंद झालाय की काय असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे.

तुमचा लाभ बंद झाला का? (Ladki Bahin Yojana Is Your Benefit Stopped)

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे. यामध्ये लाखो महिला निकषात अपात्र ठरल्या आहेत. त्यांचा लाभ तर बंद झाला आहे. याचसोबत केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. दरम्यान, केवायसीत चुका झाल्यामुळे अनेक महिलांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. केवायसीतील दुरुस्ती झाल्यानंतर या महिलांचा लाभ पुन्हा एकदा सुरु केला जाईल. दरम्यान, तुम्हाला पुढच्या महिन्याचे पैसे मिळणार की नाही हे तुम्हाला कळणार आहे.

तुमचे नाव आहे की नाही, या वेबसाइटवर समजणार (Ladki Bahin Yojana Status Check Online)

सर्वात आधी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर अर्जदार लॉग इन पर्यायावर क्लिक करा.

तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकावा.

यानंतर तुम्ही लाभार्थी यादी किंवा अर्जाची स्थिती या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला आधार नंबर आणि अर्जाचा नंबर टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला पुढच्या महिन्याचा लाभ मिळणार की नाही हे समजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते प्रलंबित, शेतकऱ्यांच्या खात्यात ₹4,000 कधी येणार?

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT