Ladki Bahin Yojana Google
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत कोणाला मिळणार १५०० रुपये अन् कोणाला ४५००? जाणून घ्या

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या अकाउंटला तिसरा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये काही महिलांना १५०० तर काहींना ४५०० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता येत्या २९ सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या अकाउंटला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये जमा झाले आहेत.

आता या महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीत, तर ज्या महिलांच्या अकाउंटला ३००० रुपये जमा झाले आहेत त्यांना १५०० रुपये कधी मिळणार?तसेच सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना किती पैसे मिळणार? असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात आहेत. (Ladki Bahin Yojana 3rd Installment)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा १९ सप्टेंबरला पार पडणार आहे. याच दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. यातील सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

ज्या महिलांच्या अकाउंटला आतापर्यंत एकही रुपया जमा झाला नाही त्यांना ४५०० रुपये मिळणार आहेत. अनेक महिलांना काही कारणात्सव अर्ज भरता आला नाही. त्यांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केले होते. या महिलांना तीन महिन्याचे ४५०० रुपये एकत्र येणार आहे. (Ladki Bahin Yojana)

१५०० रुपये कोणाला मिळणार? (Who Will Recieve 1500 Rupees)

ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात अर्ज केला आहे. त्याचसोबत त्यांना दोन महिन्याचे ३००० रुपये मिळाले आहेत. त्या महिलांना आता सप्टेंबर महिन्यात १५०० रुपये मिळणार आहे. हे पैसे २९ सप्टेंबरला महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहेत.

ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले आहेत. त्यांना या योजनेचे पैसे मिळणार आहेत. या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk And Curd : दूध आणि दही एकत्र खातांय? होऊ शकतात या समस्या

Maharashtra Live News Update: भंडारा जिल्हा बँकेत नाना पटोलेंच्या पॅनलचा पराभव

Liver damage symptoms: पायांमधील 'हे' बदल सांगतायत लिव्हर खराब झालंय; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

Kartoli Bhaji Recipe: श्रावणात करटोलीची भाजी कशी बनवायची?

ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी रेडी, शिंदे-फडणवीस नेमकं काय करणार?

SCROLL FOR NEXT