Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता; पुन्हा पडताळणीला सुरुवात

Ladki Bahin Yojana These Women Will Not Get 1500 Rupees: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता काही महिलांचे अर्ज बाद होतील.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता कधी येणार, असा प्रश्न महिलांना पडला आहे. मे महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, मे महिन्याचा हप्ता पुढच्या आठवड्यात येऊ शकतात. त्याआधीच लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता काही महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये.

या महिलांना मिळणार नाही मे महिन्याचे १५०० रुपये (These Women Will Not Get May Month Installment)

ज्या महिलांनी नियमाबाहेर जाऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे.त्यांचे अर्ज आता बाद केले जाणार आहेत. याचसोबत अनेकांनी फ्रॉ करुनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठी फसवणूक झाली होती.

अनेक फ्रॉड खाती उघडून योजनेचा लाभ घेतल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे आता या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी पुन्हा अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. यामधून फ्रॉड खात्यांमध्येही पैसे जमा केले जाणार नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा लाडक्या बहि‍णींवर टांगती तलवार असणार आहे.

या लाडक्या बहि‍णींच्या अर्जाची तपासणी होणार नाही (Ladki Bahin Yojana Verification)

लाडकी बहीण योजनेत निकषाबाहेर जाणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. या योजनेत केशरी व पिवळे रेशनकार्डधारकांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार नाही. अन्न व पुरवठा मंत्रालयाने कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना हे रेशनकार्ड दिले आहेत. त्यामुळे या अर्जांची पडताळणी होणार नाही.

लाडकी बहीण योजनेत पुढच्या आठवड्यात मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येणार असल्याचे बोलले जात होते. आता महिना संपायला फक्त १० दिवस उरले आहेत. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT