Ladki Bahin Yojana SAAM TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana: टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० मिळणार नाहीत, कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana These Women will Not Get January Installment: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता अनेक महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीये.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट

या महिलांना मिळणार नाही जानेवारीचा हप्ता

जानेवारीचे १५०० रुपये न मिळण्यामागची कारणे

जानेवारी महिना संपत आला आहे. जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु आहे तरीही महिलांच्या खात्यात या महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न महिलांना पडला आहे. दरम्यान, या महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. दरम्यान, काही महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीये.

या महिलांना मिळणार नाही जानेवारीचा हप्ता (Ladki Bahin Yojana These Women Will Not Get January Installment)

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी (Ladki Bahin Yojana KYC) करण्यास सांगितले होते. केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ आधीच बंद झाला आहे. दरम्यान, आता केवायसी करुनही अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीत. अशा महिलांची पुन्हा प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. या पडताळणीमध्ये ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यातदेखील अनेक महिलांचा लाभ बंद केला जाऊ शकतो.

लाडकी बहीण योजनेत पैसे न येण्यामागची कारणे

लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत २०२५-२६ साठी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेत आतापर्यंत २६.३४ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. याचसोबत अनेक महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे. कुटुंबातून दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेऊ शकत नाही. यामुळेही अनेक महिलांचा लाभ बंद होऊ शकतो. आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार असल्याने अनेक महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Tourism : तुम्हाला किल्ल्यावर भटकंती करायला आवडते? मग गडचिरोलीमधील 'हे' ठिकाण फिरायला अजिबात विसरू नका

Indian Oil Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार इंडियन ऑइलमध्ये नोकरी; ३९४ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी प्रशासन सज्ज

Shocking: मुंबईत स्पीकर अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान भयंकर घडलं; थरारक VIDEO समोर

Health Care : अननस खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT