Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: महत्त्वाची बातमी! या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही पुढचा हप्ता; तुमचं नाव आहे का?

Ladki Bahin Yojana these Women Not Get Benefits: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता काही महिलांना पुढचा हप्ता मिळणार नाहीये.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महिना संपत आला आहे त्यामुळे महिला जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहे. महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे जूनचा हप्ता कधी येणार असं सर्वजण विचारत आहे. लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. परंतु सध्या लाभार्थी असलेल्या अनेक महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. याबाबत आधीच माहिती देण्यात आली आहे.

या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ (These Women Will Not Get Benefit Of Scheme)

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहे. या निकषात बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळतो. दरम्यान, काही महिलांनी निकषाबाहेर जाऊन अर्ज केले आहेत. त्यामुळे त्यांना या योजनेतून बाद केले जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेकांना महिलांच्या नावाखाली लाभ घेतले आहे. बोगस कागदपत्रे बनवूनदेखील योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच अनेक बांग्लादेशी महिलांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. बनावट आधार कार्ड आणि माहिती देऊन अकाउंट ओपन केले आहे. या योजनेत फक्त महाराष्ट्रातील महिलाच लाभ घेऊ शकतात. त्यामुळे या महिलांना बाद केले जाणार आहे.

उत्पन्नाची पडताळणी (Income Verification)

या योजनेत फक्त त्याच महिला लाभ घेऊ शकतात ज्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे. जर यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT