Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना यापुढे कधीच मिळणार नाही ₹१५००; कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana These Women will not get 1500 Rupees: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता या महिलांना कधीच योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

या महिलांना मिळणार नाही १५०० रुपये

यापूर्वी कधीच मिळणार नाही हप्ता

लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरचा हप्ता देण्यात आला आहे. दरम्यान, आता महिला नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. लवकरच नोव्हेंबरचे पैसेदेखील महिलांना दिले जातील. दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु आता या योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीयेत.

या महिलांना मिळणार नाहीत ₹१५०० (Ladki Bahin Yojana These Women will not get 1500 Rupees)

बहीण योजनेत अनेक महिलांना निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारने महिलांच्या अर्जांची पडताळणी केली आहे. यामध्ये पडताळणीत ज्या महिलांनी नियमांचे पालन न करता १५०० रुपयांचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज बाद केले आहेत. त्यामुळे या महिलांना यापुढे १५०० रुपये मिळणार नाहीत.

राज्यातील जवळपास २६ लाख महिलांचे अर्ज बाद करण्याचे असल्याचे सांगितले होते. यामध्ये अनेक सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनीही लाभ घेतला आहे. तर अनेक महिलांच्या नावाखाली पुरुषांनी योजनेअंतर्गत पैसे लाटले आहेत. यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्यांना यापुढे योजनेअंतर्गत एकही रुपया मिळणार नाहीये. याचसोबत अनेक महिलांनी खोटे पत्तेदेखील दिले आहेत. त्यांचाही लाभ बंद करण्यात आला आहे.

राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांद्वारे महिलांच्या अर्जांची पडताळणी केली होती. महिलांच्या घरोघरी जाऊन छाननी करण्यात आली. यामध्ये ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांचाही लाभ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या महिलांनी खोटे पत्ते दिले आहेत. तसेच एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांचेही पैस बंद करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swapna Shastra: स्वप्नात 'या' 5 गोष्टी दिसल्यास भाग्य उजळेल, लक्ष्मी येईल घरात

ट्रान्सजेंडर अन् तरूणामध्ये फोटोवरून वाद; दोघांनी माहीम खाडीत मारली उडी, बचाव पथकाचा शोध सुरू

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक आरक्षणाची सोडत जाहीर; अर्ध्या जागा महिलांसाठी राखीव, कुणाला कुठे संधी?

Maharashtra Live News Update : रूपाली ठोंबरे पाटील उद्या घेणार अजित पवारांची भेट

Delhi Red Fort: दिल्लीचा लाल किल्ला पूर्वी होता शुभ्र संगमरवरी; कोणी बदलला याचा रंग?

SCROLL FOR NEXT