Ladki Bahin ₹3000 two months installment date Diwali Saam
बिझनेस

Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यावर 'या' दिवशी ३,००० येणार? महत्त्वाचं कारण आले समोर

Ladki Bahin Yojana September installment latest update : लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या ₹१५०० हप्त्याची अद्याप प्रतीक्षा आहे. दसऱ्यानंतर हप्ता मिळण्याची शक्यता असून विलंब झाल्यास सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे मिळून ₹३००० एकत्र देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin ₹3000 two months installment date Diwali : ऑक्टोबर महिन्याची ७ तारीख उजाडली आहे, तरीही अद्याप सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत अपडेट आलेली नाही. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या अखेरीस खात्यावर जमा होण्यास सुरूवात झाली होती, तर जुलैचा हप्ता ऑगस्टच्या अखेरीस देण्यात आला होता. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबरच्या शेवटी मिळणार का? असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून विचारला जात आहे. (when will Ladki Bahin ₹1500 installment be credited)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दसऱ्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता जमा केला जाऊ शकतो. मात्र, २५ ते २८ ऑक्टोबरदरम्यान याबाबत सरकारकडून जीआर (GR) प्रसिद्ध झाला नाही, तर ऑक्टोबर अखेरपर्यंत हप्ता मिळण्याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत सरकार सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३,००० रुपये (Ladki Bahin September october installment date,) एकत्र जमा करण्याची शक्यता आहे. कारण नोव्हेंबरमध्ये दिवाळीचा सण असल्याने महिलांना मोठा आर्थिक दिलासा दिला जाऊ शकतो. (Ladki Bahin Yojana payment date October 2026)

दिवाळी गोड करण्यासाठी सरकार लाडक्या बहि‍णींना दोन महिन्यांचा सन्मान निधी एकत्र देण्याचा विचार करू शकतो, असे सांगितले जात आहे. पण यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. राज्यातील १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. दरम्यान, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर ८० लाखांपेक्षा जास्त महिलांचा लाभ बंद झाला आहे. सध्या सर्व महिला सप्टेंबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सरकार ऑक्टोबर अखेरीस १,५०० रुपये देणार की दिवाळीच्या तोंडावर एकत्र ३,००० रुपये देणार, याचीच चर्चा सध्या महिलांमध्ये रंगली आहे. (Ladki Bahin October installment)

दरम्यान, ई-केवायसी (e-KYC) अपूर्ण असल्यामुळे किंवा बँक खात्याशी आधार लिंक नसल्यामुळे हजारो महिलांचे हप्ते रोखले गेले आहेत. त्यामुळे सप्टेंबर आणि दिवाळीचा एकत्र मिळणारा हप्ता कोणत्याही अडथळ्याविना खात्यात जमा व्हावा, यासाठी महिलांनी आपले बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही आणि ई-केवायसी पूर्ण झाली आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Ladki Bahin e-KYC and Aadhaar link payment update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये आणखी एक दुष्काळाचा बळी; नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

Ajit Agarkar: अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपला; नवा सिलेक्टर कोण होणार? BCCI ने मागवले अर्ज

Shocking : भयंकर! पाण्याची टाकी साफ करायला उतरले परत बाहेर आलेच नाहीत; ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Lemon Water : सकाळी रिकाम्यापोटी 'या' बिया लिंबू पाण्यात मिसळून प्या; वजन, शुगर अन् बीपी कायम राहील कंट्रोलमध्ये

Morning Tea Side Effects: सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने ॲसिडीटी होते का? आरोग्यावर होणारे 5 परिणाम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT