Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकींनो सप्टेंबरचे ₹१५०० खात्यात आले की नाही? सोप्या पद्धतीने करा चेक

Ladki Bahin Yojana ₹1500 Recieve or not Check: लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, तुमच्या खात्यात १५०० आले की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

खात्यात १५०० रुपये जमा झाले की नाही असं करा चेक

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. पुढच्या दोन-तीन दिवसांत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

लाडकीच्या खात्यात पैसे जमा झाला की नाही, असं करा चेक (Ladki Bahin Yojana Installment Recieve or Not)

लाडकीच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की तुम्हाला मेसेज येईल. यावरुन तुम्हाला समजेल खात्यात १५०० रुपये आले की नाही.तसेच तुम्ही बँकेच्या अधिकृत अॅपवर जाऊनदेखील पैसे आले की नाही हे चेक करु शकतात. तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये सर्व माहिती मिळेल.याचसोबत तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेही पैसे आले की नाही हे चेक करु शकतात. बँकेत जाऊन तुम्हाला पासबुकवर एन्ट्री करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पैसे आले की नाही त्याची माहिती मिळणार आहे.

लाडक्या बहिणींना हप्त्यासाठी केवायसी अनिवार्य

लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा हप्ता मिळणार नाहीये. तुम्हाला यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. या दोन महिन्याच्या कालावधीत जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तुमचा लाभ बंद केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: पैसा, करिअर आणि कुटुंब... या ५ राशींचं नशीब चमकणार! वाचा मंगळवारचे राशीभविष्य

अंबाजोगाईतील मॅरेथॉनपटूची राज्यभरात चर्चा; लेकीच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी धाव

'समृध्दी'वरील दरोड्याचं बीड कनेक्शन; लूटमार टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

SC-ST समाजासाठी गुड न्यूज! आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही मिळणार गंभीर आजारांवरील मोफत उपचार

कॅन्सरशी दीर्घ लढा अपयशी; IPS अधिकाऱ्याचं निधन,पोलीस दलावर शोककळा

SCROLL FOR NEXT