Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यावर दिवाळीत ₹३०००? सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana September-October Installment Come Together: लाडकी बहीण योजनेत अजूनपर्यंत सप्टेंबरचा हप्ता देण्यात आलेला नाही. आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार

दिवाळीत महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होण्याची शक्यता

ऑक्टोबर महिना सुरु झाला आहे. पहिला आठवडादेखील संपला तरही अद्याप लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत. दरम्यान, आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार असल्याच्याही चर्चा सुरु आहे. याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकीला सप्टेंबर- ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana September-October Installment May Come Together)

लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, ऑक्टोबरदेखील सुरु झाला आहे आणि ऑक्टोबरचेही पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.दरम्यान, लवकरच हे पैसे दिले जाऊ शकतात.

मागील अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते लांबणीवर जात आहेत. त्यामुळे या महि्याचाही हप्ता लांबणीवर गेल्याने काही आश्चर्य वाटत नाहीये. मात्र, अजूनही माहिती दिलेली नाही, त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

लाडकी बहीण योजनेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येऊ शकतो. सणासुदीचा मूहूर्त साधत महिलांना ३००० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. दिवाळीत हे पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात. राज्य सरकार दिवाळीचा मूहूर्त साधत पैसे देतील, अशी आशा महिलांच्या मनात आहे. दरम्यान, याबाबत आदिती तटकरे लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.

या महिलांनाच मिळणार सप्टेंबरचा हप्ता (These Women Will Get September Installment)

लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. आता फक्त ज्या महिलांनी केवायसी केली आहे त्यांनाच सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य केले आहे. यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्याआधी महिलांनी केवायसी करण्याचे आवाहन आदिती तटकरेंनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

Dal Makhani recipe: रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी घरच्या घरी कशी बनवाल, लिहून घ्या रेसिपी

Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ

Historical Places : पर्वतरांगांच्या सान्निध्यात अन् नद्यांच्या संगमावर वसलाय 'हा' किल्ला, इतिहासातील अनोखा जलदुर्ग

उत्तर प्रदेशहून पहाटे ट्रेन मुंबईत पोहचली, ४ वाजता पोलिसांनी जनरल डब्ब्यात धाड टाकली, बॅग पाहून सगळेच चक्रावले

SCROLL FOR NEXT