Ladki Bahin Yojana  SAAM TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana: १२ हजार पुरुषांनी लाटले लाडकीचे पैसे, सरकारला लावला १६२ कोटींचा चुना, RTI मधून धक्कायदाक माहिती समोर

Majhi Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूकीच्या घटना घडत आहे. अनेक बोगस लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक घोटाळे झाले आहे. लाखो अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अनेक पुरुषांनीही या योजनेचा लाऊ घेतला आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण आला आहे. लाडकी बहीण योजनेत १२ हजार पुरुषांनी दर महिन्याला १५०० रुपयांचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे.

बोगस पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ

लाडकी बहीण योजनेतून १२ हजार ४३१ पुरुष अपात्र आहेत. तर ७७ हजार ९८० महिला अपात्र ठरल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून या महिला व पुरुष लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते. अशी माहिती अमरावतीचे आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांना मिळालेली आहे. दरम्यान, आता या अपात्र लाभार्थ्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

एकूण ९० हजार ४११ लाभार्थी अपात्र

महिला व पुरुष असे दोघेही मिळून ९० हजार ४११ लाभार्थी अपात्र ठरले आहे. हे अपात्र स्त्री-पुरुष लाभार्थी गेल्या वर्षभरापासून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते. या अपात्र लाभार्थ्यांमुळे महाराष्ट्र सरकारला 162 कोटी रुपयाचा चुना लागला आहे. या लाभार्थ्यांकडून हे पैसे वसूल करावे व त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी केलेली आहे..

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक अपात्र पुरुषांनी आणि महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. याआधीच लाडकी बहीण योजनेचा निधी उपलब्ध करताना सरकारच्या तिजोरीवर ताण पडत आहे. त्यात लाखो अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे तर सरकारचे अजूनच नुकसान झाले आहे. त्यामुळे आता सरकार या अपात्र लाभार्थ्यांकडून वसूली करणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा हाहाकार! १६ जिल्ह्यांना रेड- ऑरेंज अलर्ट, मुख्यमंत्र्यांकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Bhandara : रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यावर धक्कादायक प्रकार आला समोर; मुलीच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखलगुन्हा दाखल

Maharashtra Rain Live News: रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला; आंबा आणि कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडली

सौरमालेतील सर्वात थंड तापमान असलेला ग्रह कोणता?

Flood Video : पुराच्या पाण्यातून वाट काढत होता, बघता बघता वाहून गेला तरूण; थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT