Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार

Ladki Bahin Yojana October Installment Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना भाऊबीजेला ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार का असा प्रश्न विचारला जात आहे. कदाचित दिवाळीत महिलांना खुशखबर मिळू शकते.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?

भाऊबीजेची ओवाळणी मिळणार का?

लाडक्या बहिणी प्रतिक्षेत

लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरचा हप्ता जमा झाला आहे. त्यानंतर आता ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ऑक्टोबरचे १५०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारत आहे. दिवाळीत लाडकीच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची अपेक्षा महिलांना आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लाडकीच्या खात्यात भाऊबीजेची ओवाळणी येणार की नाही असा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे.

लाडकीला भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? (Ladki Bahin Yojana October Installment Update)

लाडकी बहीण योजनेत मागील अनेक महिन्यांचे हप्ते लांबणीवर गेले आहेत. याचसोबत अनेकदा सणासुदीचा मूहूर्त साधून महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. त्यामुळेच यंदादेखील दिवाळीत भाऊबीजेचा मूहूर्त साधत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा करण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

याच महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार (Only These Women Will get Ladki Bahin Yojana Installment)

लाडकी बहीण योजनेत ज्या महिला निकषांमध्ये बसतात त्यांनाच योजनेचा हप्ता दिला जातो. ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन अर्ज केलेत त्यांचे अर्ज बाद केले आहे. अंगणवाडी सेविकांनी लाभार्थी महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली आहे. त्यामुळे फक्त त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत.

याचसोबत आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी अनिवार्य केले आहे. ज्या महिलांनी केवायसी केले नाही त्यांचाही हप्ता बंद होणार आहे. केवायसी करण्यासाठी नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिलेला आहे. त्या कालावधीत तुम्हाला केवायसी करायची आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर नोव्हेंबरनंतर तुमचा हप्ता बंद होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठवे वेतन आयोग आणि जुन्या पेन्शनबाबत महत्वाची अपडेट समोर

Skin Care: उन्हामुळे चेहऱ्याचा ग्लो जाणून पिंपल्स आणि डलनेस वाढलाय? मग या घरगुती फेसमास्कमुळे प्रॉब्लेम्स होतील दूर

Pune Crime: पुणे हादरले! हॉटेलमध्ये तरुणावर कोयत्याने सपासप वार, थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

SCROLL FOR NEXT