Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार? महत्त्वाची अपडेट समोर

Ladki Bahin Yojana November Installment Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार?

निवडणुकीनंतर पैसे येण्याची शक्यता

नोव्हेंबर महिना संपायला अवघे ५ दिवस उरले आहेत. दरम्यान, आता लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत अजूनही कोणती अपडेट समोर न आल्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. नगरपरिषदेच्या निवडणूकीपूर्वी हप्ता येण्याची शक्यता होती. मात्र, आता नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार? (Ladki Bahin Yojana November Installment May Be Delay)

नोव्हेंबर महिना संपणार आहे. अजूनही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कदाचित हा हप्तादेखील पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे.

येत्या २ आणि ३ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या कालावधीत लाडकी बहीण योजनेत हप्ता देणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्याआधी किंवा त्यानंतर पैसे दिले जातील. दरम्यान, निवडणुकीआधी पैसे देण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे कदाचित हा हप्ता पुढे ढकलण्यात येईल.

डिसेंबरमध्ये मिळणार पैसे

नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर गेल्यानंतर तो पुढच्या महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. जर डिसेंबर महिन्यात पैसे दिले तर दोन महिन्याचे ३००० रुपये एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे.याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याआधी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना केवायसी करणे गरजेचे आहे. तुम्ही ३१ डिसेंबरपूर्वी केवायसी करायचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

मोठी बातमी! टर्म संपण्याआधीच राष्ट्रपती राजीनामा देणार? भारताशेजारील देशात काहीतरी घडतंय

Maharashtra News Live Update: राहुल गांधींसह खासदार गांधी स्मृतीस्थळी दाखल

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

Farmer Loan Waiver Scheme: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ

SCROLL FOR NEXT