Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा हप्ता लांबणीवर जाणार; जानेवारीत खात्यात ₹४५०० जमा होण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana November-December And January Installment: लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

या दिवशी खात्यात जमा होतील ४५०० रुपये

डिसेंबर महिन्याचे शेवटचे १० दिवस उरले आहेत. डिसेंबर महिना संपत आला तरीही अजून नोव्हेंबरचा हप्ता देण्यात आला नाहीये. नोव्हेंबरसोबत डिसेंबरचा हप्तादेखील कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता त्यात हे हप्ते लांबणीवर जाणार असल्याचे बोलले जात आहे.

नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता कधी येणार याची वाट लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पाहत आहेत. त्यातच आता जानेवारीचा हप्तादेखील एकत्र येऊ शकतो, असं सांगितलं जात आहे. जर हे तिन्ही हप्ते एकत्र आले तर महिलांना ४५०० रुपये मिळणार आहेत. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा केली जाईल.

जानेवारी महिन्यात येऊ शकतात पैसे (Ladki Bahin Yojana Installment May Come In January)

जानेवारी महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. राज्यात उद्या नगरपरिषद आणि नगपंचायतीसाठी मतदान होणार आहे. यानंतर निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबरला लागणार आहे. त्यामुळे या कालावधीत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. यामुळेच जानेवारी पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाडक्या बहिणींना केवायसी अनिवार्य (Ladki Bahin Yojana KYC)

लाडकी बहीण योजनेत महिलांना लाभ घ्यायचा असेल तर केवायसी अनिवार्य केले आहे. केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत आहे. त्याआधी जर तुम्ही केवायसी केले तरच तुम्हाला त्यापुढचा लाभ मिळणार आहे. अन्यथा लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जाणार आहे. महिलांना ऑनलाइन पद्धतीने केवायसी करायची आहे. तुम्ही मोबाईल किंवा स्मार्टफोनवरुन केवायसी करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणे हादरलं! प्राचार्यने केला पीएचडीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, तरुणीने संपवल आयुष्य; आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहलं कारण

राज्यातील सत्ता बदल की सरकारमधील फेरबदल? ३० आमदारांनी गाठली दिल्ली; सरकारचं टेन्शन वाढलं

Weekly Horoscope: या राशींना खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं, वाचा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

मोठी बातमी! नाशिक, पुणे, नागपूरसह ईडीची ११ ठिकाणी छापेमारी, नेमकं कारण काय?

Periods Late Solution: २ महिने झाले तरी पिरियड्स अजून आले नाहीत? मग करा हा सोपा घरगुती उपाय, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT