Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार नाही , सरकारचा मोठा निर्णय

Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यामध्येही काही महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांचे अर्ज तपासून त्यातील निकषाबाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. सर्व महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी करण्यास महिला व बालविकास विभागाने सांगितलं आहे. दरम्यान, यातही काही महिलांचे अर्ज हे तपासले जाणार नाहीत. त्यामुळे या महिलांना दिलासा मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेत या महिलांच्या अर्जांची तपासणी होणार नाही (Ladki Bahin Yojana These Women Application Will Not Disqualified)

लाडकी बहीण योजनेत गेल्या वर्षी २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यातील अनेक महिलांच्या अर्जांची पडताळणी करुन ते अर्ज बाद करण्यात आले आहेत. यात नियमांचे उल्लंघन करुन लाभ घेतलेल्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत. दरम्यान, यातही काही महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाहीत. पिवळे व केशऱी रेशनकार्डधारक असलेल्या महिलांच्या अर्जांची तपासणी होणार नाही.

केशरी व पिवळे रेशनधारक म्हणजे त्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत. या महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्याची गरज नाही. अन्न धान्य पुरवठा विभागाने हे रेशन कार्ड दिलेले आहेत. त्यामुळे या महिलांच्या अर्जांची तपासणी करण्याची गरज नाही, असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता या महिलांना पैसे मिळणार आहेत.

लाडक्या बहि‍णींना मे महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा

लाडक्या बहि‍णींना आता मे महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. एप्रिलचा हप्ता देण्यात आला. त्यानंतर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. मे महिन्याची आज १६ तारीख आहे. अद्याप लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला चिंतेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PMC News: विकासकामांच्या पैशांवर नगरसेवकांचा डल्ला? पुणे महापालिकेतील टक्केवारीचं रेटकार्ड उघड

Dark Chocolate : डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे! हृदयापासून मेंदूपर्यंत होतील मोठे बदल

Gold Price: देशात सोनं टंचाई? आयात रखडली, किंमती वाढणार? व्यवहारांनाही मोठा ब्रेक

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत स्ट्रीट लाईट बंद

Pune University: बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई; रमेश मुखेकर निलंबित

SCROLL FOR NEXT