Maharashtra Ladki Bahin Yojana Saam TV Marathi
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचं नाव बदलणार, मंत्री आदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाल्या?

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याच्या चर्चेवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. योजनेच्या नामांतराबाबत सरकार सकारात्मक विचार करेल, असे त्यांनी सांगितले.

Namdeo Kumbhar

Will Ladki Bahin Yojana be renamed after Ajit Pawar : लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याच्या चर्चांवर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ही योजना महायुती सरकारच्या एकत्रित प्रयत्नांतून साकार झाल्याचे स्पष्ट करत त्यांनी या योजनेच्या निर्मितीमागील तिन्ही नेत्यांचे योगदान सांगितले. (Aditi Tatkare statement on Ladki Bahin scheme name change)

वयोश्री व श्रावणबाळ योजनेचा विचार करून लाभार्थी वयोमर्यादा २१ ते ६५ वर्षे करण्याची सूचना अजित पवार यांन केली होती. तर या योजनेत २१ वर्षांवरील अविवाहित तरुणींचा समावेश करण्याची सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केलेली. तर एकनाथ शिंदे योजनेचा निधी १,२०0 रुपयांवरून १,५00 रुपये करण्याचा महत्त्वाचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतला होता, असे तटकरेंनी सांगितले. या महत्त्वपूर्ण योगदानामुळेच हे तिघे नेते राज्यात 'तीन लाडके भाऊ' म्हणून ओळखले गेले, असे तटकरे यांनी नमूद केले.

नावाच्या संदर्भात सकारात्मक विचार

योजनेला अजित पवार यांचं नाव देण्याबाबत बोलताना तटकरे म्हणाल्या की, हा निर्णय शासन स्तरावरील असून सरकार त्यावर नक्कीच सकारात्मक विचार करेल. अजित पवार हे माझे नेते कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. योजनेला अजित पवार यांचं नाव देण्यासंदर्भातील योग्य निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मिळून घेतील.

ऑक्टोबरचे १५०० कधी येणार?

दिवाळीमध्ये राज्य सरकारने सप्टेंबर महिन्याचा १५०० रूपयांचा सन्मान निधी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला होता. आता दिवाळी संपली, त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा निधी कधी मिळणार? अशी चर्चा महिलांमध्ये सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याबाबतचा जीआर लवकरच निघू शकतो. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर १५०० रूपयांचा सन्माननिधी जमा केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूर शहराला 'संत्र्याचे शहर' किंवा 'ऑरेंज सिटी' का म्हणतात?

Maharashtra News Live Update: मुंबईतील मिठी नदीजवळ नाल्यात आढळला मृतदेह

Makeup Removal Tips: रोज मेकअप करता? मग मेकअप काढताना या ७ गोष्टींची नक्की घ्या काळजी

India vs New Zealand: मॅट हेन्री भारताला नडला! पत्त्यांप्रमाणे गडगडली टीम इंडिया, न्यूझीलंडकडून 244 रन्सने पराभव

Gold Silver Price: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोनं तब्बल 2,500 रुपयांनी स्वस्त; चांदीचे दरही कोसळले, वाचा 24K आणि 22K चे दर

SCROLL FOR NEXT