Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी मोठी बातमी! ८ दिवसांत महिलांच्या खात्यात ₹ १५०० जमा होणार

Ladki Bahin Yojana May Month Installment Update: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार असं महिला विचारत आहेत. दरम्यान, ८ दिवसांत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होऊ शकतात.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकीला मे महिन्यात १५०० रुपये मिळणार आहे. परंतु आता महिना संपायला अवघे ८ दिवस उरले आहेत. तरीही लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु आता ८ दिवसांत महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत महिनाअखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला हवेत. त्यामुळे महिना संपायला फक्त काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. जर पुढच्या आठवड्यात १५०० रुपये आले तर महिलांना खूप आनंद होईल.

लाडक्या बहि‍णींना मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येईल, असं बोललं जात होतं. दरम्यान, जर या महिन्याअखेरपर्यंत पैसे जमा झाले नाहीत तर हप्ता लांबणीवर जाऊ शकतो. लाडक्या बहि‍णींना पुढच्या महिन्यात दोन्ही हप्त्याचे पैसे मिळू शकतात. परंतु मे महिन्यातच पैसे मिळावे, असं महिलांना वाटत आहे.

लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार की नाही? (When Will 2100 Rupees Get)

लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुका होऊन बरेच दिवस झाले आहेत. तरीही अद्याप २१०० रुपयांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मार्चमध्ये झालेल्या बजेटमध्ये २१०० रुपयांबाबत घोषणा होईल, अशी आशा होती. मात्र, असं काहीच झालं नाही. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर २१०० रुपये देऊ, असं अजित पवारांनी सांगितलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaishnavi Kalyankar: 'देवमाणूस'च्या खऱ्या बायकोचा नऊवारीतील मनमोहक लूक पाहिलातं का?

Maharashtra Politics: तयारीला लागा! उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, पण मनसेसोबतच्या युतीबाबत सस्पेन्स

Raksha Bandhan 2025: बायकोने नवऱ्याला राखी बांधावी की नाही?

भाजपात बंपर इनकमिंग! काँग्रेस अन् शिवसेनेला खिंडार; बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते भाजपवासी

कबुतरांना दाणे टाकण्यास विरोध केल्याने राडा; वृद्धासहित मुलीवर रॉडने हल्ला,VIDEO

SCROLL FOR NEXT