Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना मिळाला नाही मार्च-एप्रिलचा हप्ता; खात्यात आले नाही ₹३०००; नेमकं कारण काय?

Ladki Bahin Yojana March April Installment Update: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात मार्च-एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे. दरम्यान, अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यामागे अनेक कारणे आहेत.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च-एप्रिलचा हप्ता जमा

या महिलांना मिळालेच नाहीत ₹३०००

पैसे न येण्याचं कारण काय?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात मार्च-एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात ३००० रुपये आले आहेत. लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. परंतु अनेक महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्याचा हप्ता दोन महिन्यांसाठी लांबणीवर गेला आहे. त्यानंतर आता दोन्ही हप्ते एकत्र मिळत असल्याने लाडक्या बहि‍णींना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. पैसे जमा न होण्यामागची अनेक कारणे असू शकतात.

या महिलांना मिळाला नाही लाभ (Ladki Bahin Yojana These Women Will Not Get Benefit)

लाडकी बहीण योजनेचे काही निकष ठरवून देण्यात आले आहे. यामध्ये पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळत आहे. याचसोबत ज्या महिलांनी केवायसी केले त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. एका कुटुंबातील फक्त एकच महिला योजनेचा लाभ घेऊ शकते. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. सरकारी नोकरी करत असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना योजनेचा लाभ मिळत नाही. दरम्यान, याचसोबत ज्यांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नाही त्यांचाही लाभ बंद करण्यात आला आहे.

याचसोबत सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य केले होते.केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. त्यांना यापुढे एकाही महिन्याचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे तुम्हीही या सर्व निकषांमध्ये पात्र नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

देशभरातून खासदार-आमदार दिल्लीत दाखल; ३ प्रमुख मागण्यांसाठी थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा, राहुल गांधींची आक्रमक प्रतिक्रिया

Monsoon Update : मुसळधार पाऊस झोडपणार! २४ राज्यांना अलर्ट जारी; महाराष्ट्रात कसं असेल हवामान? वाचा

भीमनवार सक्तीच्या रजेवर, मुंढेंच्या हाती सूत्रे! पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित, मध्यरात्री मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT