Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडकीच्या खात्यात कधीही जमा होऊ शकतात ₹३०००; मार्च-एप्रिल हप्त्याबाबत अपडेट

Ladki Bahin Yojana March April Installment Update: लाडकी बहीण योजनेत अजून मार्च महिन्याचा हप्ता दिलेला नाही. लाडकी बहीण योजनेत कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

लाडकीच्या खात्यात कधीही जमा होऊ शकतो हप्ता

याच आठवड्यात पैसे मिळण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना कधीही खुशखबर मिळू शकते. लाडक्या बहि‍णींना आता लवकरच योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता मे महिना उजाडला तरीही दोन महिन्यांपूर्वीचा हप्ता दिलेला नाही. लाडक्या बहि‍णींना मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिलेला नाही. दरम्यान, आता हा हप्ता लवकरच मिळू शकतो.

लाडकीच्या खात्यात कधीही जमा होऊ शकतात पैसे (Ladki Bahin Yojana Installment Recieve Date)

लाडकी बहीण योजनेत याच आठवड्यात मार्च आणि एप्रिलच हप्ता येण्याची शक्यता आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठतीत लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पैसे मंजूर झाल्यानंतर DBT द्वारे खात्यात जमा होतील. आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. दरम्यान, याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडक्या बहि‍णींना किती पैसे मिळणार? (Ladki Bahin Yojana How Much Money Women Get)

लाडकी बहीण योजनेत महिलांना आता या महिन्यात किती पैसे मिळणार असाही प्रश्न पडला आहे. मार्चपासूनचा हप्ता रखडला आहे. त्यामुळे यावेळी लाडक्या बहि‍णींना फक्त मार्च महिन्याचे १५०० रुपये येणार की मार्च एप्रिल महिन्याचे ३००० रुपये एकत्र येणार असा प्रश्न विचारला जात आहे. याचसोबत आता मे महिन्याचाही हप्ता मिळणार का असाही प्रश्न विचारला जात आहे.

जर तीन महिन्याचे पैसे दिले तर लाडक्या बहि‍णींना एकत्र ४५०० रुपये मिळतील. दरम्यान, केवायसीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.ईकेवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद केला आहे. त्यामुळे लाखो महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update : पगारातून PF कापलं जातं, पण अकाउंटमध्ये पैसे जात नाही? सर्वात आधी ही एक गोष्ट करा!

बिल्डर घराचं पझेशन देण्यास टाळाटाळ करतोय? RERAचा नियम जाणून घ्या; व्याजासह मिळणार संपूर्ण पैसा परत

Maharashtra News Live Update: भुसावळमध्ये संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

Celebrity Ganpati: सुबोध भावे ते सोनाली कुलकर्णी; मराठी कलाकारांच्या घरी गणरायाचं थाटात स्वागत

पक्ष बदलणाऱ्या खासदार- आमदारांना चाप बसणार; पक्षांतर रोखण्यासाठी कपिल सिब्बलांनी सुचवला 'मास्टरप्लॅन'

SCROLL FOR NEXT