Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹३००० जमा; तुम्हाला आले का? योजनेत तुमचं नाव आहे का? अशा प्रकारे चेक करा स्टेट्स

Ladki Bahin Yojana March-April Installment Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे. दरम्यान, तुम्हाला पैसै मिळणार की नाही हे चेक करा.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा

तुम्हाला पैसे आले की नाही?

तुमचं नाव अजूनही योजनेत आहे की नाही? अशा पद्धतीने करा चेक

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांच्या खात्यात मार्च-एप्रिलचा हप्ता जमा केला आहे. महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, अनेक महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे आले आहे.

लाडक्या बहि‍णींना आधी मार्चचा हप्ता मिळाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एप्रिलचा हप्ता देण्यात आला. दरम्यान, अनेक महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.दरम्यान, तुमचा हप्ता बंद झाला की नाही याचा स्टेट्‍स तुम्ही चेक करु शकतात.

अशा प्रकारे चेक करा स्टेट्स (Ladki Bahin Yojana Status Check Online)

तुम्हाला सर्वात आधी ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका. पासवर्ड पुन्हा जनरेट करता येतो.

यानंतर लाभार्थी यादी किंवा अर्जाची स्थितीवर क्लिक करा. यानंतर आधार नंबर आणि अर्ज क्रमांक टाकावा लागेल.

यानंतर तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे तुम्हाला कळणार आहे.

लाखो महिलांचे अर्ज बाद (Ladki Bahin Yojana Ineligible Women List)

लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक महिलांनी केवायसी केली नाही त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा केले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT