Maharashtra Ladki Bahin Yojana Saam TV Marathi
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! इतक्या महिला ठरल्या पात्र, पण यांचा ₹१५०० चा लाभ कायमचा बंद

Ladki Bahin Yojana eKYC deadline update 2026 : लाडकी बहीण योजनेत e-KYC न केल्यामुळे ५४ लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय मार्च-एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार, यावरही काही माहिती समोर आली.

Namdeo Kumbhar

e-KYC for Ladki Bahin Yojana Update News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ५४ लाख महिला अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे. ३० एप्रिलपर्यंत सर्व लाडक्या बहि‍णींना ईकेवायसी करण्याची मुदत दिली होती. गुरूवारी ईकेवायसी करण्याची मुदत संपली असून आता पात्र महिलांची आकडेवारी समोर आली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्यासाठी शेवटच्या दिवशी अल्प लाभार्थींनी प्रतिसाद दर्शवलाय. मार्च-एप्रिल महिन्यात केलेल्या ई-केवायसीनंतर १ कोटी ८९ लाख बहिणी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. तर तर ५४ लाख लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत. मार्चअखेर हा आकडा ६८ लाख होता. एका महिन्यात १४ लाख लाभार्थींनी ई-केवायसी दुरूस्ती करताना सरकारी कर्मचारी नाही, असे स्पष्ट केले आहे. यापूर्वी त्यांनी चुकून सरकारी कर्मचारी आहोत, असे नमूद केले होते.

e-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात १ कोटी ८९ लाख भगिनी या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, तर ५४ लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत. मार्च अखेर अपात्र असलेल्या ६८ लाख महिलांपैकी १४ लाख महिलांनी एका महिन्यात आपली माहिती सुधारली आहे. यापूर्वी त्यांनी चुकून 'सरकारी कर्मचारी आहोत' असे नमूद केले होते, जे e-KYC करताना 'सरकारी कर्मचारी नाही' असे स्पष्ट केले आहे. ज्या ५४ लाख भगिनी अपात्र ठरल्या आहेत, त्यांचा या योजनेचा लाभ आता बंद होणार आहे. या योजनेसाठी e-KYC करण्याची शेवटची मुदत ३० एप्रिल २०२६ रोजी संपली आहे. सरकारकडून आता ईकेवायसी करण्याची मुदत वाढवण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, ३८०० रूपयांनी झालं स्वस्त, वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेटमार्च-एप्रिलचा हप्ता कधी येणार?

फेब्रुवारी २०२६ नंतर राज्यातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर एकही हप्ता आलेला नाही. एक मे हा दिवस उजाडला आहे, पण अद्याप लाडकीच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिल असे दोन हप्ते एकत्र येतील, असे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. मे महिन्याच्या १० तारखेपर्यंत लाडकीच्या खात्यात एकत्र ३००० रूपये येऊ शकतात, असे काहीजण सांगत आहेत. पण अद्याप यावर सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण अथवा माहिती देण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-पुणे मिसिंग लिंकचं मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडून पहिला प्रवास, VIDEO

Shocking : परीक्षेत कमी गुण मिळाले, ११ वीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल; वडिलांची बंदूक घेतली अन्...

Maharashtra News Live Update : यवतमाळमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळा बसविण्यावरून वाद

Raja Shivaji Review: रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' थिएटरमध्ये पास की फेल; प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Zunka - Bhakri Recipe: महाराष्ट्र दिनानिमित्त घरीच बनवा अस्सल गावरान पद्धतीचा 'झुणका आणि भाकर', सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT