Ladki Bahin Yojana March 1500 installment update : ईकेवायसीच्या पडताळणीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा (Ladki Bahin Payment Status) होण्यास सुरूवात झाली आहे. गुरूवार संध्याकाळपासून अनेक लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin eKYC payment news) हप्ता जमा झाल्याचा मेसेज आला. मार्च, एप्रिल आणि मे.. या ३ महिन्यांचा एकत्र हप्ता येईल, असा अनेकांना अंदाज (when will April May Ladki Bahin installment come) होता. पण सरकारकडून फक्त एकाच महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर १५०० रूपये (why only ₹1500 credited in Ladki Bahin scheme) जमा झाले होते. त्यानंतर 3 महिने उलटल्यानंतरही फक्त एकच हप्ता जमा झाल्याने लाडक्या बहिणींमध्ये काहीशी नाराजी आहे. एप्रिलचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Next Installment Date) असा सवाल विचारला जात आहे.
लाडकीच्या खात्यात किती जमा? (Ladki Bahin Yojana march 1500 Installment Credited)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाअंतर्गत (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना १५०० रूपयांचा सन्मान निधी सरकारकडून दिला जातो. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत हप्ता जमा होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. पण ईकेवायसी आणि आर्थिक वर्ष यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता ३ महिन्यांपासून जमा झाला नाही. रिपोर्ट्सनुसार, लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाचवेळी ३ हजार अथवा ४५०० रूपयांचा हप्ता जमा होईल, असे सांगण्यात येत होते. पण गुरूवारपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त १५०० रूपये जमा होत असल्याचे समोर आले आहे.
लाडक्या बहिणी नाराज -
आज अनेक महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा झाल्याचे संदेश (SMS) प्राप्त झाले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले बँक खाते तपासून पाहण्याचे आवाहन केले जात आहे. यापूर्वी महिलांना दोन महिन्यांचे मिळून एकत्रित ३००० रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात केवळ १५०० रुपयेच जमा झाले आहेत. ३००० रुपये मिळतील ही आशा अपुरी राहिल्याने लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, योजनेच्या नियमांचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या महिलांवर प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. अपात्र महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांच्या आकड्यातही घट झाली आहे.
एप्रिलचा हप्ता कधी येणार? when will April May Ladki Bahin installment come
राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात मार्च महिन्यांचा १५०० रूपयांचा सन्मान निधी जमा होत आहे. पण एप्रिल आणि मे महिन्यांचे पैसे कधी जमा होणार? असा सवाल पात्र महिलांना पडला आहे. अर्धा मे महिना संपला आहे, पण अद्याप एप्रिलच्या हप्त्याबाबत माहिती नाही, त्यामुळे आता दोन्ही हप्ते एकत्र येणार का? की मे महिन्याच्या अखेरीस एप्रिल महिन्याचा हप्ता दिला जाईल, असाही अंदाज लावला जात आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची पडकाळणी करण्यासाठी राज्य सरकारकडून ईकेवायसी मोहीम करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील ७० लाख महिलांचा लाभ बंद झाल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. या ७० लाख महिलांचा १५०० रूपयांचा लाभ कायमचा बंद करण्यात आला आहे. काही महिला अपात्र ठरल्या आहेत, तर काही महिलांकडून ईकेवायसी करण्यातच आली नाही. एक कोटी ७० लाख महिला पात्र ठरल्या असून त्यांना यापुढे १५०० रूपयांचा लाभ मिळणार आहे. ७० लाख महिला अपात्र ठरल्यामुळे सरकारचे १० हजार कोटी वाचणार असल्याचेही म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.