Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता अपात्र महिलांची पुन्हा फेरपडताळणी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय

लाडक्या बहिणींचा पुन्हा होणार फेरपडताळणी

महिला व बालविकास विभागाची अपडेट

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या नवीन निर्णयामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यांना दिलासा मिळणार आहे. त्यांच्या अर्जांची पुन्हा एकदा फेरपडताळणी होणार आहे. महिला व बालविकास विभागाने अपात्र महिलांबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यामुळे लाखो महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे.

लाडक्या बहिणींची फेरपडताळणी

लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन अर्जांची पडताळणी करत आहेत. यातून अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये काहींचे उत्पन्न जास्त आहे तर काही लाभार्थी महिला या सरकारी कर्मचारीदेखील आहे. यामुळे या लाभार्थी महिलांचे अर्ज बाद केले आहेत. लाखो महिलांचे अर्ज बाद झाल्यामुळे महिलांमध्ये नाराजीचा सूर होता. मात्र, आता याच अपात्र महिलांना शेवटची संधी देणार आहेत. या महिलांची पुन्हा एकदा शेवटची फेरपडताळणी केली जाणार आहे. यामध्ये ज्या महिला खरच पात्र आहेत त्यांना लाभ मिळणार आहेत. ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.

लाडकी बहीण योजनेत राज्य स्तरावर महिलांच्या अर्जांची पडताळणी केली गेली. यातील ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून ही फेरपडताळणी केली जाणार आहे. दरम्यान, या पडताळणीसाठी महिलांनी प्रतिसाद द्यावा, असं आवाहन महिला व बालविकास विभागाने दिले आहे.

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत २६ लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या आहेत. या महिलांचे लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. यामध्ये महिलांना वयोमर्यादेत बसत नसतानाही योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला. या फेरपडताळणीतून ज्या महिला पात्र आहेत त्यांनी अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पडताळणीनंतर महिलांना योजनेचा लाभ मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake: जरांगेला विमानात कोंबवा थेट आफ्रिकेला पाठवा; लक्ष्मण हाके यांचा घणाघात|VIDEO

Sharad Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करा 'हे' उपाय, मिळेल सुख आणि समृद्धी

Heart Health: सकाळच्या वेळेस हार्ट अटॅकचा धोका अधिक का असतो? संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब

Big Boss 19: बिग बॉसच्या घरात पुन्हा वाद पेटला, अभिषेक बजाज आणि अमाल मलिक एकमेकांना भिडले, Promo आला समोर

Bhiwandi Crime : भक्षकच! चिमुरडीचे शोषण केल्यानंतर अटक, २ महिन्यांपूर्वी कोर्टातून पळाला अन् पुन्हा अत्याचार करुन लहान मुलीला संपवलं

SCROLL FOR NEXT