Ladki Bahin Yojana Google
बिझनेस

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्रिपदाचा पेच, लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लांबणीवर? वाचा नवी अपडेट

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणार का याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आता या रक्कमेत वाढ करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते.लाडकी बहीण योजनेअंतर्गत निवडून आल्यावर २१०० रुपये देणार असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी केले होते. (Ladki Bahin Yojana News)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना १५०० रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५ हप्ते देण्यात आले आहेत. आता पुढचा सहावा हप्ता कधी देणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे.

लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबर महिन्यात महिलांच्या अकाउंटला जमा होणार का असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.(Ladki Bahin Yojana Next Installment)

राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. परंतु अजूनही मुख्यमंत्रीपदाचा पेच काही सुटत नाही. महायुती सरकारमधून कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले नाही. येत्या २-३ दिवसांत मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित होईल, त्यानंतर महाराष्ट्राला नवं सरकार मिळेल. परंतु यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर नोव्हेंबर महिन्यात सत्ता स्थापन झाली तर पुढच्या महिन्यात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाईल. परंतु आता जोपर्यंत सत्ता स्थापन होत नाही तोपर्यंत महिलांना सहाव्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत ५ हप्ते दिले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अॅडव्हान्समध्येच देण्यात आला होता. त्यामुळे आता फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता बाकी आहे. तो हप्तादेखील पुढच्या महिन्यात दिला जाऊ शकतो. (Ladki Bahin Yojana Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Turmeric Bath Benefits: हळदीच्या पाण्याने आंघोळ करा, त्वचेचे इन्फेक्शन, खाज आणि मुरुम होतील कमी

Satara Accident: अंबाबाईच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, कारला ट्रकची जोरदार धडक, चौघांचा जागीच मृत्यू

MHADA Lottery : घरं घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी; म्हाडाने वाढवली अर्ज करण्याची मुदत; शेवटची तारीख काय? वाचा

Maharashtra News Live Update: पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन

Tiger Shroff : टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात नवा खुलासा; शूटर्सच्या निशाण्यावर होता सलमान खान, पण...

SCROLL FOR NEXT